'नमो'चा जळगावात डंका : विक्रेत्यांनी केले शेवभाजी वडापावचे मोफत वाटप !

साधारण तीन क्‍विंटलचा नाश्‍ता वाटप करण्यात आला. याकरीता दोन क्‍विंटल पालक, दोन गोणी कांदा व 80 किलो तेल लागले. निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेला शब्द विक्रेत्यांनी तरी खरा केला याचीच चर्चा आज दिवसभर सुरू होती.
Jalgav-shev-bhaji.
Jalgav-shev-bhaji.

जळगाव :  लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील हॉटेल भुमीचे हरीश कोल्हे यांनी आज दोन हजार शेवभाजीचे पार्सल मोफत वाटप केले. तर रथचौकातील भजी विक्रेत्याने वडपाव नाश्‍त्याचे वाटप केले. 

देशात पुन्हा एकदा नमो..नमो..चा डंका राहिला. मात्र निकाल लागण्यापुर्वी लावण्यात येणाऱ्या तर्कवितर्कात मोदी सरकारच यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्‍त केली जात होती. इतकेच नाही तर अनेकजण पैजा लावत होते. 23 मेच्या निकालात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यास मोफत नाश्‍ता वाटप आणि जेवणाचे पार्सल वाटप करण्याचे यापुर्वीच शहरातून दोघांनी जाहीर केले होते. तसे पोस्टर देखील लावले होते. 

निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी हॉटेल भुमीचे मालक हरीष कोल्हे यांनी आज (ता.24) यांनी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पार्सल वाटप केले. याकरीता साधारण 90 ते 100 किलो शेव मागवून त्याची भाजी तयार करण्यात आली होती. या भाजीचे पार्सल साधारण दोन हजार नागरीकांना मोफत वाटप केले. पार्सल घेण्यासाठी नागरीकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जुने जळगाव बहुउद्देशिय मित्र मंडळाचे साधारण शंभर ते सव्वाशे जण मदतीसाठी उपस्थित होते. 

तीन क्‍विंटलचा नाश्‍ता वाटप 
शहरातील रथ चौक परिसरातील मधु कोळी व भुषण सोनवणे यांचे नाश्‍त्याचे शॉप आहे. मोदी सरकार आल्यास मोफत नाश्‍ता देण्याचा मनोदय व्यक्‍त केला होता. त्यानुसार मोदी सरकार आल्याने आज सकाळी सात वाजेपासून नाश्‍त्याच्या गाडीवर मोफत नाश्‍ता देण्यास सुरवात केली.

 साधारण सात ते दुपारी बारापर्यंत नाश्‍त्याची गाडी सुरू ठेवून येणाऱ्यांना पोटभर नाश्‍ता वाटप केला. नाश्‍त्यामध्ये पालक भजी, कांदा भजी, पाववडे आणि खमंग (30 किलो) असा नाश्‍ता ठेवण्यात आला होता. यामध्ये साधारण तीन क्‍विंटलचा नाश्‍ता वाटप करण्यात आला. याकरीता दोन क्‍विंटल पालक, दोन गोणी कांदा व 80 किलो तेल लागले. निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेला शब्द विक्रेत्यांनी तरी खरा केला याचीच चर्चा आज दिवसभर सुरू होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com