आपल्या गावातून लोकसभेला जास्त लीड देणारा होणार जळगाव बाजार समितीचा सभापती

लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे.
Shiv-Sena
Shiv-Sena

जळगाव : जिल्ह्यात सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेना समर्थककांकडे असून, सेना नेतृत्वाकडून निष्ठावंतास संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

त्यात माजी उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे व अनिल भोळे यांच्यात सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु शेवटी लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या मतमोजणीत इच्छुकांच्या गावात भाजपला किती मते मिळतील, यावरही सभापतिपदाची संधी बहाल करण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे.
 

कैलास चौधरी हे खेडी खुर्द येथील आहे. भरत बोरसे हे भादली खुर्दचे असून, अनिल भोळे हे वावडदा (ता.जळगाव) येथील सोसायटीच्या माध्यमातून तालुक्‍याच्या राजकारणात आले आहे. अर्थातच या इच्छुकांच्या गावात भाजपा उमेदवार उन्मेष पाटील किंवा भाजपला किती मते मिळतील, यानंतर सभापतिपदासंबंधी सेना व भाजप नेते ठोस निर्णय जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सभापती निवडीसंबंधी २७ मे (सोमवारी) रोजी बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी आहे. सभापती निवडीपूर्वी लोकसभेचा निकाल हाती येणार असल्याने निवडीबाबत उत्सुकता आहे.

अनिल भोळे हे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या पॅनेलच्या माध्यमातून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले होते. ते मूळचे साळवा येथील आहे. तर भरत बोरसे हे शिवसेना समर्थक असून, सलग चार वेळेस ते निवडून आले आहे. सुरेश जैन यांच्या नेतृत्वात त्यांना एकदा सभापतिपदाची संधी मिळाली आहे. तर कैलास चौधरी हे शिवसेना नेते सुरेश जैन व गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत मानले जातात. चौधरी हे जिल्हा बॅंकेतील पीकविमाप्रश्‍नाचे आंदोलन आणि केळीची इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर मोजणी या मुद्यांच्या पाठपुराव्यासह आंदोलनासंबंधी जिल्हाभर चर्चेत आले होते.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com