Jalgaon ZP members Husband Used Shabby Words to CEO | Sarkarnama

जळगाव जिल्हा परिषद सीईओना भाजप सदस्या पतीची शिवागाळ 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 20 जुलै 2019

जिल्हा सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांना दालनात येण्यास मज्जाव केल्याने संतप्त झालेले चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओना शिवीगाळ गेली, आज दुपारी हा प्रकार घडला त्यामुळे जिल्हा परिषदेत काही वेळ खळबळ उडाली. 

जळगाव : जिल्हा सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांना दालनात येण्यास मज्जाव केल्याने संतप्त झालेले चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओना शिवीगाळ गेली, आज दुपारी हा प्रकार घडला त्यामुळे जिल्हा परिषदेत काही वेळ खळबळ उडाली. 

चंद्रशेखर अत्तरदे आज दुपारी जिल्हा परिषदेत काही निमित्त आले होते. त्यावेळी ते सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्या दालनात गेले असता. सीईओ नी त्यांना तुम्ही कोण? असा प्रश्‍न विचारला त्यावेळी अत्तरदे संतप्त झाले व त्यांनी थेट सीईओना शिवीगाळ सुरू केली. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व पदाधिकारी जमा झाले होते. काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. 

चंद्रशेखर अत्तरदे हे भुसावळ पालिकेत भाजपचे स्विकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्या साळवा-बांभोरी गटातून भाजपतर्फे निवडून आल्या आहेत. तर त्यांच्या मातोश्री रजनी अत्तरदे या  जळगाव महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या सोळा (ब)मधून प्रभागातून निवडून आल्या आहेत.  चंद्रशेखर अत्त्तरदे यांची जिल्हा परिषदेत वाद घालण्याची दुसरी वेळ आहे.यापूर्वी त्यांनी बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी कापडणीस यांना शिवीगाळ केली होती. त्यावेळी मध्यस्थानी हा वाद मिटविला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख