Jalgaon Seem Low Voting | Sarkarnama

जळगावात मतदानात अनुत्साह, उमेदवारांची धास्तावून धावपळ 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

चर्चा मतदानाची नव्हे तर सांगा किती आले? याचीच होती. विशेष म्हणजे उमेदवारांच्या प्रभाग कार्यालयाबाहेर मतदारांची प्रंचड गर्दी दिसून येत आहे. परंतु, मतदान केंद्रावर मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे उमदेवार धास्तावले असून मतदारांसाठी धावपळ करतांना दिसून येत होते. 

 

जळगाव : राजकारणातील नाराजी, होत नसलेली कामे यामुळे जनतेचे जणू काही उमेदवारांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र जळगाव महापालिका जळगावात दिसून आले आहे. शहरात दुपारी एक वाजेपर्यत सरासरी केवळ 13 टक्केच मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला.

चर्चा मतदानाची नव्हे तर सांगा किती आले? याचीच होती. विशेष म्हणजे उमेदवारांच्या प्रभाग कार्यालयाबाहेर मतदारांची प्रंचड गर्दी दिसून येत आहे. परंतु, मतदान केंद्रावर मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे उमदेवार धास्तावले असून मतदारांसाठी धावपळ करतांना दिसून येत होते. 

जळगाव महापालिकेच्या 75 जागासाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी ृआज मतदान होत आहे. शहरात सर्वच भागात मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह तयारी आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मात्र पहिल्या दोन तासात तर मतदान केंद्रावर मतदार फिरकल्याचे दिसले नाही. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रावर एक, दुसरा मतदार दिसून आला. विशेष म्हणजे सुशिक्षित भागातील मतदान केंद्रावरही हिच स्थिती दिसून आली. 

शहरातील अनेक भागात उमेदवारांनी बुथ लावलेले आहेत. प्रभागातील उमेवारांच्या बुथवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. परंतु मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येत होता. त्यामुळे नेमक्‍या चित्राबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मतदारामध्ये राजकारणाबाबत कमालीची उदासिनता दिसून येत आहे. मात्र काही भागात फिरून कानोसा घेतला असता. अनेक ठिकाणी सांगा किती येणार? अशी चर्चा आहे. त्यामुळे राजकीय लोक आपली कसोटी घेतात. मग मतदानाच्या दिवशीही त्यांची परिक्षा घेण्याचे मतदारांनी ठरविलेले चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. त्यामुळे सर्वच प्रभागात उमेदवारांचे कार्यकर्ते जनतेच्या दारात फिरत असतांनाही नागरिक मतदांनासाठी बाहेर निघत नसल्याचे चित्र दुपारी एक वाजेपर्यंत दिसून आले आहे. मात्र दुपारी तीन वाजेनतर मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख