उमर खालीद, योगेंद्र यादव यांच्या जळगाव जिल्ह्यातील उद्याच्या सभेबाबत प्रश्‍नचिन्ह

भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे उद्या (ता.8) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ व जळगाव येथे होणाऱ्या उमर खालीद व योगेंद्र यादव यांच्या सभेस पोलीसांनी अद्यापपर्यंत परवानगी नाकारली आहे. मात्र आयोजक समिती सभा घेण्यावर ठाम आहे.तर संविधान समर्थन समितीनेही सभेस विरोध केला आहे. त्यामुळे या सभेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
jalgaon police denies permission to publik rally of yogesh yadav and umar khalid
jalgaon police denies permission to publik rally of yogesh yadav and umar khalid

जळगाव : भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे उद्या (ता.8) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ व जळगाव येथे होणाऱ्या उमर खालीद व योगेंद्र यादव यांच्या सभेस पोलीसांनी अद्यापपर्यंत परवानगी नाकारली आहे. मात्र आयोजक समिती सभा घेण्यावर ठाम आहे.तर संविधान समर्थन समितीनेही सभेस विरोध केला आहे. त्यामुळे या सभेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे उद्या (ता.8) उमर खालीद व योगेंद्र यादव यांच्या जाहिर सभांचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर येथे सकाळी नऊ वाजता, भुसावळ येथे दुपारी तीन वाजता तर जळगाव येथे सायंकाळी सात वाजता या सभा होणार आहेत. मात्र या तीनही सभांना पोलीसांनी अद्याप परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे आयोजक संविधान बचाव नागरिक कृती समिती या तीनही ठिकाणी सभा घेण्यावर ठाम आहेत. तर भाजपप्रणित संविधान समर्थन समितीनेही या सभांना विरोध केला असून त्यांना परवानगी देवू नये अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यामुळे आता या सभेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बचाव समिती सभेवर ठाम
सभेच्या आयोजक संविधान बचाव समितीच्या प्रतिभा शिंदे यांनी याबाबत म्हटले आहे, की आम्ही सविधान बचाव समितीतर्फे अळमनेर, भुसावळ व जळगाव येथे सभा आयोजित केल्या आहेत. आम्ही पोलीसांना कळविले आहे. आम्हाला अद्यापही लेखी परवानगी मिळालेली नाही. संविधानातील कलम 19 मध्ये दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे तशा लेखी परवानगीची आवश्‍यकता नाही. आम्ही प्रशासनाचा आदर करतो, त्याच प्रमाणे संविधानाच्या चौकटीच्या आधारावर आम्ही कर्तव्याची जाणीव ठेवत आहोत. त्यामुळे आम्ही आमचे कार्यक्रम करणार आहोत.

संविधान समर्थन समितीचा विरोध
संविधान समर्थन समितीने या तीनही सभांना विरोध केला आहे. समितीतर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना जळगाव जिल्हा प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार स्मिता वाघ आदीनी हे निवेदन दिले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com