एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसेंकडून पंढरपूरसाठी मोफत रेल्वे

एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसेंकडून पंढरपूरसाठी मोफत रेल्वे

जळगाव : "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, पंढरीनाथ महाराज कि जय''च्या गजर टाळ, मृदंगाच्या तालात आज भुसावळ रेल्वे स्थानक दुमदुमले. निमित्त होते आषाढी एकादशीनिमित्ताने स्पेशल पंढरपूर रेल्वे रवाना होण्याचे. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या वतीने भक्तासाठी यंदा पाचव्या वर्षी मोफत रेल्वेगाडीचे आयोजन करण्यात आले होते. 

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या वतीने मोफत स्पेशल रेल्वेचे आयोजन करण्यात येते. 16 डब्यांच्या या गाडीत पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांना मोफत प्रवास असतो. भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, परिसरातील भाविक भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर जमून रवाना होतात. तर प्रवासात जळगाव, पाचोरा, चाळीसगाव ,नांदगाव, मनमाड, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूंवाडी या स्थानकावरील प्रवाशांनाही या गाडीत पंढरपूरला जाण्यासाठी मोफत प्रवास असतो. 

विशेष म्हणजे प्रत्येक स्थानकावर भाविकांना चहा-पाणी फराळ मोफत असतो.आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी जाण्यासाठी तर यांत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतण्यासाठी पंढरपूरहून भुसावळसाठी हीच गाडी असते. आज सकाळी 9 वाजता भुसावळ स्थानकावरून ही गाडी पंढरपूरला रवाना झाली. यावेळी भुसावळ स्थानकावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा डोक्‍यावर घेतली होती. यावेळी भाविकांनी "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल...श्री ज्ञानदेव तुकाराम...बोला पंढरीनाथ महाराज कि जय''चा जयघोष केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com