भाजपमध्ये येणारे साधूसंत नव्हेत, मुख्यमंत्री वॉशिंग पावडरने त्यांना स्वच्छ करतात : एकनाथ खडसे 

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : ''भाजपमध्ये येणारे नेते साधूसंत नाहीत, पक्षाची ध्येय धोरणे मान्य आहेत त्यामुळेच ते येत आहेत. भ्रष्टचाराचे आरोप असलेल्या नेत्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्याकडे 'वॉशिंग पावडर' आहे, आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो, आलेल्यांना क्‍लिनचिट दिली जाते आणि ते आपल्या कामाला लागतात,'' असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले. 

जळगाव येथील एमआयडीसी भागात बालाणी रिसॉर्ट येथे आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक घेण्यात आली, तसेच जिल्ह्यातील अकरा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू आहे. खडसे या ठिकाणी उपस्थित होते. एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षात येणारे कुणीही साधू संत नाहीत, सत्तेसाठी ते भाजपत येत आहेत. आमच्या मुख्यमंत्र्याकडे 'वॉशिंग पावडर' आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना ते धूवून घेत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावेच लागते. मात्र चागंल्याची व्याख्या ठरवितांना दुमत होवू शकते''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com