jalgaon muncipal president in bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

जळगावात कॉंग्रेसला धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येश्‍याम चौधरी भाजपत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु आता ऐन निवडणूकीच्या काळात मात्र कॉंग्रेसमधून इनकमिंग सुरू झाले आहे. कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.जळगाव येथे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी भाजप-सेनेचे जळगावचे उमेदवार आमदार सुरेश भोळे.अशोक कांडेलकर, विशाल त्रिपाठी, आमदार चंदूलाल पटेल उपस्थित होते.

भाजप प्रवेशाबाबत बोलतांना डॉ.राध्येशाम चौधरी म्हणाले,  आपण कॉंग्रेसमध्ये कोणावरही नाराज नाही, उलट पक्ष नेतृत्वाने आपल्याला आजपर्यंत दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करीत आहोत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यामुळे आपण भाजपत प्रवेश करीत आहोत. यापुढेही आपण भाजपच्या माध्यमातून जनतेच्या विकास कामासाठी तत्पर राहणार आहोत.

डॉ.राध्येश्‍याम चौधरी यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही.जळगाव  कॉंग्रेसपक्षाकडे असतांना ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आली. त्यामुळे ते नाराज होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख