जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी रावसाहेब दानवे सरसावले

 जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी रावसाहेब दानवे सरसावले

जालना : जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या हालचाली सुरू असतानाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही ही जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्लॅन बी तयार केला असून त्यादिशेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. भाजपला रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका झडत असल्याची माहिती मिळाली आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने पुन्हा भाजपला दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपद महाआघाडीच्या ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यासाठी या तीन पक्षाच्या नेत्यांच्या बैठकाही झडल्या होत्या.2019 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने ऐनवेळी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या अडीच वर्षापासून जालना जिल्हा परिषदेत उदयास आलेल्या महाआघाडीच्या प्रयोगाला बळ मिळाले आहे. 

यावर्षी देखील महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र आले असून त्यांनी झेडपी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच भाजपचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची तसेच पदाधिकार्यांची बैठक घेऊन चाचपणी केली.त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यावर्षी देखील चुरस निर्माण होण्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात कशी येईल, याविषयीची योजना पक्षाने आखली असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः कुठलाही घोडेबाजार न करता जिल्हापरिषद भाजप ताब्यात घेणार असल्याचे सुतोवाच आमदार दानवे यांनी केल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांनीही आपापल्या सदस्यांची काल बैठक घेऊन भूमिका मांडली आणि सदस्यांना आवश्‍यक त्या सूचना दिल्याचे समजते. 

या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते,अशी माहिती सुत्रानी दिली.त्यामुळे 30 डिंसेबर रोजी होत असलेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती तसेच सहा जानेवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद उपाध्यक्षपदासाठी होत असलेली निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 
घोडेबाजार न होता झेडपी भाजपच्या ताब्यात ः संतोष दानवे 
या बाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष संतोष दानवे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक पारदर्शक व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीत कुठलाही घोडेबाजार न होताच झेडपी ताब्यात घेतली जाईल. राज्यात स्थापन झालेली महाविकास आघाडी जालना जिल्हा परिषदेत अडीच वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. आघाडीला कसे सामोरे जावयाचे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com