jalana zp | Sarkarnama

जालन्यात भाजपला चकवा, शिवसेना-राष्ट्रवादीचे जुळले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

जालना : जिल्हा परिषद निवडणुकीत 22 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला चकवा देत जालन्यात शिवसेना-राष्ट्रवादीचे सुत जुळले आहे. त्यानूसार मंगळवारी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाला आणि मुलीला अध्यक्ष करण्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. 

जिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक जागांसह मोठा पक्ष ठरल्यामुळे दानवे यांनी मुलगी आशा पांडे हिच्यासाठी तर लोणीकरांनी मुलगा राहूल याला अध्यक्ष करण्यासाठी जोर लावला होता. शिवसेना भाजपला साथ देईल या आशेवर हे दोन्ही नेते होते, मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीची साथ घेण्याचा निर्णय घेतला आणि भाजपचे गणित बिघडले. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचे राजकीय डावपेच अखेर भाजपला भारी ठरले असून त्यांचे बंधू अनिरुध्द खोतकर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची दाट शक्‍यता आहे. 

दानवे, लोणीकरांना दणका 
जालना जिल्हा परीषदेत 56 पैकी सर्वाधिक 22 जागा जिंकूनही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे बहुमतासाठी भाजपला आणखी 7 जागांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 13 तर कॉंग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. 2 ठिकाणी निवडून आलेले दोन अपक्ष हे शिवसेनेचे बंडखोर असल्याने त्यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 16 झाले असून राष्ट्रवादीचे 13 सदस्य मिळून 29 म्हणेज बहुमताची संख्या होते. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवडण झाल्यानंतर सभापतीपदांचे देखील दोन्ही पक्षात समान वाटप होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या खेळीने दानवे-लोणीकरांना चांगला दणका बसणार असे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख