कैलास गोरंट्याल यांचे ठरले...आमदारकीचा राजीनामा देणार

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालयांनी कार्यकर्त्यासोबत शनिवारी (ता.4) बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचानिर्णय घेतला. त्यांच्याबरोबरच जालना,भोकरदन,परतूर नगराध्यक्षांसह नगर सेवक, पंचायत समिती सदस्यही आणि कार्यकर्तेही सामुहिक राजीनामे देणार आहेत.
Congress MLA From Jalana Kailas Gorantyal Will Resign
Congress MLA From Jalana Kailas Gorantyal Will Resign

जालना : मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्याने जालन्यातील कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल व कार्यकर्ते नाराज असून पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आमदार गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यासोबत शनिवारी (ता.4) बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबरच जालना,भोकरदन,परतूर नगराध्यक्षांसह नगर सेवक, पंचायत समिती सदस्यही आणि कार्यकर्तेही सामुहिक राजीनामे देणार आहेत. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारात जालना विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. कॉंग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी जालना नगर पालिकेवर आपले वर्चस्व राखले आहे. जालना जिल्ह्याला कॉंग्रेसकडून अनेक वर्षे मंत्रिपद दिले गेलेले नाही. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात आमदार कैलास गोरंट्याल यांना मंत्रीपद द्यावे, अशी कार्यकर्त्याची मागणी होती. तीन वेळा निवडून येऊनही पक्षाने मंत्रिपद दिलं नाही म्हणून ते नाराज झाले आहेत.

मात्र, त्याची पक्षाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नगर पालिकेतील कॉंग्रेसचे पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत आहे. या नाराज कार्यकर्त्यांसोबत आमदार कैलास गोरंट्याल आजच्या बैठकीत कार्यकर्ते जी भूमिका घेतील त्यासोबत मी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असून ते पक्ष सदस्यता सह आमदार पदाचा राजीनामा देणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com