प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात असल्याने जालन्याकडे सगळ्यांचेच लक्ष

 प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात असल्याने जालन्याकडे सगळ्यांचेच लक्ष

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कॉंग्रेसचे विलास औताडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे ऍड. शरदचंद्र वानखेडे या दोन प्रमुख उमेदवारांना कशी टक्कर देतात याकडेही निरीक्षकांचे लक्ष आहे. 

जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या चार निवडणुकीत रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. मोदी लाटेत दोन लाखाहून अधिकचे मताधिक्‍य मिळवत दानवे यांनी आपला गड राखला होता. 2014 मध्ये 1612056 मतदारांपैकी 66.15 टक्के म्हणजेच 1066375 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. 

रावसाहेब दानवे यांना 55. 47 टक्के तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार विलास औताडे यांना 36.07 टक्के एवढी मत मिळाली होती. देशभरातील मोदी लाटेचा फायदा उचलत दानवे यांनी औताडेंचा तब्बल 206798 मतांनी पराभव केला होता. दानवेंना 591428 तर औताडे यांना 384630 एवढी मते मिळाली होती. 

गेल्या वर्षभरात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दानवे-खोतकर वाद, कॉंग्रेसच्या विलास औताडे यांना ऐनवेळी मिळालेली उमेदवारी, आमदार बच्चू कडू यांनी दानवेंना दिलेले आव्हान या पार्श्‍वभूमीवर राज्याचे लक्ष जालन्यातील लढतीकडे लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वाढलेले 233010 नवे मतदार काय भूमिका घेतात हे देखील यावेळी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com