jalalkheda-anil-deshmukh-salil-deshmukh-arrested-released-on-bail | Sarkarnama

`राष्ट्रवादी'चे नेते अनिल देशमुख पिता-पुत्रांना अटक, सुटका 

मनोज खुटाटे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक केली. न्यायलयातून दोघांनाही जामिन मिळाला आहे. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले होते.

जलालखेडा : माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक केली. न्यायलयातून दोघांनाही जामिन मिळाला आहे. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले होते.
 
नरखेड येथील शासकीय खरेदी केंद्र हंगाम शिल्लक असताना बंद करण्यात आले होते. तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी करीत अनिल देशमुख व सलील देशमुख यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी नरखेड पोलिसांनी अनिल देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात केले होते. त्याच प्रकरणात सोमवारी अटक करून नरखेड न्यायलयासमोर हजर करण्यात आले. येथे अनिल देशमुख व सलील देशमुख यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका करण्यात आली. 
या आंदोलनात अनिल देशमुख, सलील देशमुख, सतीश शिंदे, नरेश अरसडे, संजय चरडे, नंदलाल मोवाडे, वैभव दळवी, बबनराव लोहे, अनिल साठोणे, मनीष फुके, सुरेश बांदरे, नरेंद्र रहाटे, सुदर्शन नवघरे, सुरेश रेवतकर, गोपाल टेकाडे, जाकीर शेख, उज्वल भोयर, राहुल गजबे, हरीकांत माळोदे, ईश्वर रेवतकर, मजहर खान त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. 

शासनाची प्रेतयात्रा 
तूर खरेदी सुरू करण्यासाठी सरकारची प्रेतयात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. त्याच प्रकरणात नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपत्र नरखेड पोलिसांनी न्यायालयात दाखल केले. 

सदैव शेतक्‌यांच्या पाठीशी : अनिल देशमुख 
भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे. शेतक्‌यांच्या कोणताच प्रश्न हे गांभीर्याने घेत नाहीत. मग ते कर्जमाफी असो किंवा तुर चना खरेदी असो. कुठे आश्वासन देऊन शेतक्‌यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत. लोकशाही मार्गाने आम्ही शेतक्‌यांचे प्रश्न सोडवण्याकरता आंदोलन केले होते. परंतु आंदोलन करताना आवाज दाबण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. असे कितीही गुन्हे आमच्यावर लागले तरी चालतील. शेतक्‌यांच्या प्रश्नासाठी आमची भूमिका ही अशीच राहणार असे मत यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख