पूर्णवेळ महापालिका आयुक्तासाठी आमदार प्रदीप जैस्वालांकडून मुख्यमंत्र्यांना साकडे

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महापालिका आयुक्‍त डॉ. निपूण विनायक हे प्रदीर्घ रजेवर गेले होते. त्याकाळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. परंतु रजा संपल्यानंतर पुन्हा त्यात वाढ करून घेत निपूण विनायक आलेच नाहीत. दरम्यान, उदय चौधरी यांनी देखील आपल्याला पुढील आदेश नसल्याचे कारण देत महापालिकेत येण्यास नकार दिला होता.
  पूर्णवेळ महापालिका आयुक्तासाठी आमदार प्रदीप जैस्वालांकडून मुख्यमंत्र्यांना साकडे

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेला गेल्या महिनाभरापासून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने सगळा कारभार ठप्प झाला आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सुट्टीवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक हे अद्याप परतलेले नाहीत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सध्या प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी तात्काळ पुर्णवेळ महापालिका आयुक्तांसाठी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातले आहे. 

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांनतर होणार आहेत. या शिवाय पूर्णवेळ महापालिका आयुक्त नसल्याने शहरातील पाणी, कचरा, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा याजनेची कामे रखडली आहेत. शहराच्या विकासावर याचा परिणाम होत असल्याने महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त द्या अशी मागणी मध्य मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. 

गेल्या महिनाभरापासून राज्यात विविध राजकीय घडमोडी घडत आहेत. सत्ता पेच, राष्ट्रपती राजवट, त्यानंतर दोन दिवसांसाठी मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ अशा वेगवान घडामोडीमुळे राज्यातील बहुतांश आमदारांचा मुक्काम मुंबईत होता. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महापालिका आयुक्‍त डॉ. निपूण विनायक हे प्रदीर्घ रजेवर गेले होते. त्याकाळात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. परंतु रजा संपल्यानंतर पुन्हा त्यात वाढ करून घेत निपूण विनायक आलेच नाहीत. दरम्यान, उदय चौधरी यांनी देखील आपल्याला पुढील आदेश नसल्याचे कारण देत महापालिकेत येण्यास नकार दिला होता. 

या सगळ्याचा परिणाम शहराती विकासकामे ठप्प होण्यात झाला. सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जनतेच्या जीवनमरणाशी निगडीत प्रश्‍न सोडवण्याचा सत्ताधारी शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे. पण पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने कुठल्याच फायली जागच्या हालत नाहीयेत. निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्‍यता पाहता शिवसेनेने यापूर्वीच राज्यपालांकडे पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी निवेदन दिले होते. तेव्हा नवे सरकार येऊ द्या असे सांगण्यात आले होते. आता राज्यात महाआघाडीचे सरकार आले असून मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. आता महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त किती दिवसांत मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com