राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना मुदतवाढ ?

राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना मुदतवाढ ?

मुंबई : येत्या 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. आगामी काळात निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने प्रशासनातील अन्य महत्त्वाच्या बदल्या होणार नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव सेवानिवृत्त होत असताना त्यांना राज्य सरकारच्या शिफारसीनुसार केंद्राकडून मुदतवाढ देण्यात येते. सुरवातीला तीन आणि नंतर तीन महिने अशी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची उदाहरणे आहेत. 

त्यात जॉनी जासेफ, स्वाधिन क्षत्रिय आणि जयंत बांठिया यांचा समावेश आहे. सध्या मुख्य सचिव पदावर जैन कार्यरत आहेत. येत्या 31 जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त होत असले तरी निवडणुकीचा काळ, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. जैन यांनी मुदतवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज केला असून, त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. जैन यांना सुरवातीला तीन आणि त्यानंतर आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. 

दुसरीकडे राज्याच्या प्रशासनात महत्त्वाच्या बदल्या प्रलंबित आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्‍त अजोय मेहता, नगरविकास विभाग-1चे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभाग-2च्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव बदलीसाठी पात्र आहेत. मात्र, हे अधिकारी चार-साडेचार वर्षे त्या ठिकाणी कार्यरत असल्याने खात्याची तांत्रिक माहिती त्यांना ज्ञात आहे. त्यांची बदली केल्यास नवीन अधिकाऱ्याला विभागाची सर्व माहिती होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या बदल्या होण्याची शक्‍यता धूसर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com