मी मोदी बागेत गेलो होतो पण...

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.
मी मोदी बागेत गेलो होतो पण...

पुणे : "मी मोदी बागेत गेलो होतो पण पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो तर माझ्या खाजगी कामासाठी गेलो होतो," असा खुलासा भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

आज दुपारी भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला मोदीबाग येथे गेल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत आमदार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना, "शरद पवार मोदी बागेत राहतात हे मला तुमच्याकडून समजले. ते मोदी बागेत राहतात हे मला यापूर्वी माहित नव्हते, असे सांगत, मी मोदी बागेत गेलो होतो पण शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो तर मी माझ्या खाजगी कामासाठी तिथे गेलो होतो." असा खुलासा केला.

"शरद पवार यांच्याकडे मी वेळ मागितली असती तर आजच्या परिस्थितीत ते मला वेळ देतील असे वाटत नाही." असेही गोरे म्हणाले. "माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून मी भाजपसोबतच आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल"असे गोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com