पाच वर्षातील उच्चांक़, जायकवाडी चौदा दिवसांत 78 टक्के भऱले

पाच वर्षातील उच्चांक़, जायकवाडी चौदा दिवसांत 78 टक्के भऱले

नाशिक : नाशिकला यंदा जुलैच्या सरासरीच्या तुलनेत 120 टक्के पाऊस झाला. नद्यांना पुर आला. त्यामुळे गेल्या तेरा दिवसांत पाच वर्षातील उच्चांकी 78 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी गेले. त्यामुळे गेले काही वर्षे निवडणूकांच्या राजकारणात तापणारा समन्यायी पाणी वाटप व अन्य राजकारणाचा विषय मागे पडणार आहे.

 विशेष म्हणजे ज्या ज्या वेळी जायकवाडी ओहरफ्लो झाले त्यापेक्षा यंदा 21 टीएमसी पाणी जादा सोडल्याने मराठवाड्याचा दोन वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 

यंदा नाशिकला गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधीक पाऊस झाला. यामध्ये जायकवाडी धरण अवघ्या चौदा दिवसांत 78 टक्के भरले. एरव्ही पाण्यावरुन तापणारे राजकारण व राजकीय नेत्यांतील शाब्दीक वाद- विवादांवर पाणी पडल्याने त्याची आता शांती झाली. जायकवाडी धरण शनिवारी सायंकाळी 78 टक्के भरले. 

यामध्ये 77 टीएमसी पाण्याचा नाशिकमधून विसर्ग झाला. अद्यापही विसर्ग सुरुच आहे. गेल्या पाच वर्षातील हा उच्चांक आहे. नाशिकमधील सर्व मोठी धरणे भरली. विलंबाने संचय व अपवादानेच पुर्ण भरणारे गिरणा धरणाचाही साठाही लक्षणीय आहे. 

जायकवाडी धरण गेल्या पंधरा वर्षात 2008 मध्ये शंभर टक्के भरले. हे धरण 2016 मध्ये ओव्हरफ्लो झाले. त्यावेळीही 10 ऑगष्टपर्यंत 55.79 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. त्या तुलनेत 2015 मध्ये प्रचंड दुष्काळाची स्थिती होती. 

त्यावेळी समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये तीव्र टंचाई होती. तरीही 12 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडावे लागले होते. त्यामुळे दोन्ही बाजुंच्या नेत्यांत मोठ्या प्रमाणात वाद-विदा रंगले. न्यायालयातही हे प्रकरण गेले होते. निसर्गाने यंदा हे प्रश्‍न सोडविले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com