पुरग्रस्तांसाठी सरकारने शरद पवारांची मदत घेतली असती तर इतकी हानी झाली नसती - जयदेव गायकवाड   

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना किल्लारीमधील आपत्ती व्यवस्थानाचा अनुभव आहे. तो अनुभव पहाता सरकारने कोल्हापुरातील पूर प्रकरणात शरद पवारांची मदत घेतली असती, तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात हानी झाली नसती, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. जयदेव गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
पुरग्रस्तांसाठी सरकारने शरद पवारांची मदत घेतली असती तर इतकी हानी झाली नसती - जयदेव गायकवाड   

औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना किल्लारीमधील आपत्ती व्यवस्थानाचा अनुभव आहे. तो अनुभव पहाता सरकारने कोल्हापुरातील पूर प्रकरणात शरद पवारांची मदत घेतली असती, तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात हानी झाली नसती, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. जयदेव गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची मराठवाड्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ऍड. जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी तसेच इतर विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री. गायकवाड बोलत होते. 

श्री. गायकवाड म्हणाले, की राष्ट्रवादीतून ज्या श्रीमंत पुढाऱ्यांनी पक्ष सोडला त्या जागी आता गरीब कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजीक न्याय विभागाच्या वतीने अनुसुचित जातीच्या राज्यातील अर्ध्या जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात अशी मागणी केली आहे. त्यासाठी सामाजीक न्याय विभागाने शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. 

किल्लारी येथे झालेल्या भुकंपाची परिस्थिती शरद पवार यांनी योग्यरित्या हातळली होती. हा अनुभव पहाता कोल्हापुरातील पूर प्रकरणात राज्य सरकारने शरद पवारांची मदत घेतली असती तर किल्लारीमधला त्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव पाहता इतक्‍या मोठ्या प्रमाणात हानी झाली नसती असा दावा गायकवाड यांनी केला आहे. 

भाजप सध्या हिंदु राष्ट्रवाद लोकांच्या मनावर थोपवत आहे. त्याला मतदारांनी बळी पडू नये. लोकशाही जिवंत ठेवण्याऐवजी असा राष्ट्रवाद निर्माण करुन लोकांची दिशाभुल केली जात आहे. या हिंदू राष्ट्रवादातून जातीयवाद फोफावतो. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेला तडा जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे सामाजीक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसुचित जाती आणि जमातीच्या जागा वाढवून घेण्याच्या संदर्भात मागणी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
 
प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस त्यांच्या मागे लागली आहे. आघाडी करायची होती तर त्यांच्यावर भाजपची बी टीम अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कॉंग्रेसने घाई केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला ते शत्रु मानतात. मात्र भाजप त्यांचा मोठा शत्रु आहे. त्यामुळे मोठ्या शत्रुविरोधात लढताना छोट्या शत्रुकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला त्यांनी दिला. 

या पत्रकार परिषदेला कैलास पाटील,विजय साळवे,राजेंद्र नवगिरे यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com