पुणे विभागीय आयुक्तपदासाठी जगदीश पाटील, शेखर गायकवाड यांच्या नावांची चर्चा  

पुणे विभागीय आयुक्तपदासाठी जगदीश पाटील, शेखर गायकवाड यांच्या नावांची चर्चा  

पुणे : पुणे महसूल विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी आधिकारी जगदीश पाटील व शेखर गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या अतिरिक्त आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी पूर्ण वेळ आयुक्त म्हणून कामकाजही पाहावयास सुरवात केली आहे.

पुणे विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्तांचे एकच पद होते. मात्र विभागातील कामाचा बोजा लक्षात घेऊन आयुक्‍तांच्या मदतीला दोन अतिरिक्त आयुक्तांची गरज होती. मात्र राज्य सरकारने नव्याने एकच अतिरिक्त आयुक्तपद निर्माण करून त्या जागी डॉ. म्हैसेकर यांची नियुक्ती केली आहे. नवे विभागीय आयुक्तांची नेमणूक होईपर्यंत सध्या डॉ. म्हैसेकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. 

पुण्यात विभागीय आयुक्त होण्यासाठी सनदी आधिकाऱ्यांमध्ये इच्छुकांची संख्या नेहमीच मोठी असते. चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली असून यावेळीही इच्छुकांची संख्या मोठी आहे. दळवी 31 मार्चला निवृत्त झाल्यानंतर आयुक्तपदाची सूत्रे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली.मात्र लगेचच राव यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली. यादरम्यान डॉ. म्हैसेकर यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली तसेच त्यांच्याकडे विभागीय आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

जगदीश पाटील हे सध्या कोकण विभागाचे आयुक्त आहेत. गायकवाड यांच्याकडे भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे संचालकपद आहे. दोन्ही अधिकारी कार्यक्षम म्हणून ओळखले जातात. या दोघांपैकी सरकार कोणाची निवड करणार, याची उत्सुकता आहे.

पुणे विभागात सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर व नगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. पाच जिल्ह्यातून महसूल विभागाची 12 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेळेत व्हावा म्हणून अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे निर्माण करण्यात यावीत असा प्रस्ताव होता. मात्र एका पदाला मंजुरी देण्यात आली. त्यावर डॉ. म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे विभागीय आयुक्त म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे त्यांचे मूळ काम करण्यास त्यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा मूळ प्रश्न कायम राहणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com