मानेदादांच्या भाषणासाठी सभापती जगदाळेनीं खुर्ची घेतली डोक्यावर

मानेदादांच्या भाषणासाठी सभापती जगदाळेनीं खुर्ची घेतली डोक्यावर

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व सोनाई परिवारचे अध्यक्ष दशरथ माने यांची दोस्ती भारीच आहे. आज  माने दादांचे  पावसामध्ये सुरु असलेले भाषण ऐकण्यासाठी सभापती जगदाळे यांनी चक्क खुर्ची डोक्यावरती घेतली.

रेडणी (ता.इंदापूर) येथे आज रविवार (ता.३०) रोजी सोनाई परिवारच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्यात आली.याचे उद्घघाटन आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे  बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छावणीचे उद्घघाटन सुरु असताना झिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे आमदार भरणे यांनी भाषण आवरते घेतले.

दशरथ माने यांचे आभाराचे भाषण सुरु असताना अचानक पावसाचा वेग वाढला. व्यासपीठावरील बसलेले प्रमुख पाहुणे पावसामुळे उठून आडोशासाठी गेले. मात्र सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी खुर्ची डोक्यावरती घेवून भाषण  माने यांचे पूर्ण होईपर्यंत झिमझिम पावसामध्ये उभे राहिले.

गदाळे यांनी डोक्यावरती घेतलेल्या खुर्चीची  व दोघांच्या दोस्तीची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे. 
२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जगदाळे, माने, घोलप या कुंटुंबांनी भरणे यांना जोरदार साथ दिल्याने भरणे आमदारच्या खुर्चीवर विराजमान झाले. मात्र २०१९ च्या विधानसभेसाठी भरणे, सभापती आप्पासाहेब जगदाळे, झेडपीचे सभापती प्रवीण माने हे तिघे राष्ट्रवादी कॉग्रेसमधून इच्छुक आहेत

राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता असून इंदापूरची जागेचा पेच निर्माण होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीनंतर इंदापूरची जागा कॉग्रेसला सोडणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. इंदापूर तालुक्यामध्ये जगदाळे व माने यांना मानणारा मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून दोघांनी एकमेकांना साथ दिल्यास तालुक्यातील विधानसभेच्या निवडणूकीमध्ये वेगळे चित्र निर्माण होइल, अशी चर्चा सुरु झाली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com