महिलानो, दररोज झाडू मारा, सदृढ राहा !  - jadu rajstan government news | Politics Marathi News - Sarkarnama

महिलानो, दररोज झाडू मारा, सदृढ राहा ! 

वृत्तसंस्था
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

जयपूर : पारंपरिक खेळांमुळे महिलांचे आरोग्य कसे सदृढ राहते असे बोलले जाते. याची आठवण राजस्थानातील शिक्षण विभागाला झालेली दिसते. महिलांना दररोज खेळणे शक्‍य नाही म्हणून त्यांनी सदृढ राहण्यासाठी घरात न चुकता झाडू मारण्याबरोबरच दळणकांडण्याचा करण्याचा अजब सल्ला दिला आहे. 

महिला सबलीकरण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे सरकार राजस्थानात सत्तेवर असताना शिक्षण विभागाने महिलांना घरात झाडू मारण्याबरोबरच पारंपरिक घरकाम करण्याचा सल्ला दिला आहे. 

शालेय शिक्षकांवर केंद्रीत असलेले "शिविरा' हे राजस्थान सरकारचे मासिक आहे. यामध्ये शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत लेख प्रकाशित केले जातात. या अंतर्गतच नोव्हेंबर महिन्यातील अंकात महिलांना सदृढ राहण्यासाठी सोपे उपाय या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

महिलांना सदृढ राहयचे असेल तर सकाळी-सकाळी फिरायला जायलाच हवे तसेच पळणे, सायकल चालवणे किंवा कोणताही खेळप्रकार, व्यायाम हे चांगले उपाय आहेत. महिलांनी दळण दळणे, पाणी भरणे, झाडू मारणे, फरशा पुसणे सारखी घरकामांमुळे चांगला व्यायाम होऊ शकतो असे या लेखात म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयावर चौफेर टीका होऊ लागली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख