jadhav arrest from mumbai police | Sarkarnama

आमदार हर्षवर्धन जाधव यांना मुंबईत पोलिसांकडून अटक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा या मागणीसाठी मंत्रालयाशेजारी ठिय्या आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. राज्यात, विशेषतः औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत तीन बळी गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्काळ अध्यादेश काढा या मागणीसाठी आज दुपारी हर्षवर्धन जाधव यांनी मंत्रालय परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या समाधीजवळ ठिय्या दिला होता. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या पक्षातील आमदरांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हर्षवर्धन जाधव मुंबईत आले होते. पण बैठकीपुर्वीच औरंगाबादेत आणखी एका तरूणाने आत्महत्या केल्याचे कळताच जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्यपाल कार्यालयात फोनवरून संपर्क साधला होता. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन अधिक चिघळले असून तातडीने ऍक्‍शन घ्या, अध्यादेश काढा अशी मागणी जाधव यांनी केली होती. पण ती मान्य न झाल्यामुळे मंत्रालयाशेजारी ठिय्या देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख