jadhav and shivsena chief | Sarkarnama

विशेष विमानाने औरंगाबादला जाऊन भास्कर जाधवांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी (ता.13) औरंगाबाद गाठत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भास्कर जाधव हे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्यासह विशेष विमानाने औरंगाबादमध्ये आले होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कुंभेफळ जवळ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा त्यांच्याकडे दिला. 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भास्कर जाधव यांना अधिक वेळ लागू नये म्हणून विशेष काळजी घेतली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे एका कार्यक्रमाला जाणार होते. तत्पूर्वीच जालना रोडवरील एका ठिकाणी भास्कर जाधव येऊन थांबले होते. हरिभाऊ बागडे यांना उशीर झाला होता. मात्र हरिभाऊ बागडे यांनी थेट मोटरसायकलवर बसूनच भास्कर जाधव जिथे वाट पाहत थांबले होते तिथे ते पोहोचले. 

राजीनामा दिल्यानंतर भास्कर जाधव ,नार्वेकर, परब यांच्यासमवेत विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भास्कर जाधव आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख