शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार...

 शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार...

औरंगाबाद : शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शिवसेनेच्यावतीने पोलिसात करण्यात आली आहे. औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदार संघाचे संघटक नगरसेवक राजू वैद्य यांनी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्याकडे वैद्य यांच्या स्वाक्षरीने शिवसैनिकांनी बुधवारी (ता.16) तक्रार दिली. त्यात राजू वैद्य यांनी म्हटले आहे, पूर्व मतदार संघात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारात असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलवर व्हायरल झालेली व्हिडिओ क्‍लिप दाखवली. त्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव कन्नड तालुक्‍यातील चिंचोली या गावी मंगळवारी (ता.15) जाहीर सभेत भाषण करताना दिसत आहेत. जाहीर सभेत त्यांनी शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुखांना उद्देशून असभ्य उदगार काढून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिविगाळ केली व जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न केला असून जाधव यांच्यावर कार्यवाही करण्याची तक्रारीत मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com