केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे - हर्षवर्धन जाधव

 केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजाने केलेला त्याग, काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने या संपूर्ण संघर्षाचा हा विजय आहे. राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. एक लढाई आपण जिंकलो असलो तरी दुसरी लढाई ही केंद्रात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची व्यापती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तसा कायदा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा आरक्षणासाठी सर्वात आधी राजीनामा देणारे तत्कालीन शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने केलाला कायदा मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवत या विरोधातील याचिका फेटाळून लावली. या संदर्भात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यांशी संपर्क साधला असता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतांना ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी राजीनामा दिला, त्यानंतर समाजातील विविध घटकांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी काहीना काही पावले उचलली जात होती. 

अनेक लोकप्रतिनिधींवर देखील दबाव होता. मराठा समाजाने शांततामय मार्गाने काढेलेले राज्यभरातील मोर्चे, तरुणांनी दिलेले बलिदान, न्यायालयीन लढा देणारे समाज बांधव या सगळ्यांच्या संघर्षाचा विजय म्हणून या निर्णयाकडे मी पाहतो. राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी केंद्राच्या युपीएससीअतंर्गत दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये देखील हे आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रात देखील मराठा आरक्षण टिकले पाहिजे आणि त्यासाठी लोकसभेत कायदा केला तरच त्याची व्याप्ती वाढेल. मराठा आरक्षणाचा खऱ्या अर्थाने या समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये लाभ द्यायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडे माझी एकच मागणी आहे, की त्यांनी आता राज्याप्रमाणेच केंद्र सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण कायदा पास करून घ्यावा. आजच्या निकालाबद्दल मी न्याय व्यवस्थेचेही आभार मानतो असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com