J. P. Nadda says this election is crucial for Maharashtra | Sarkarnama

ही निवडणूक महाराष्ट्राचे भविष्य ठरवणारी : जे. पी. नड्डा

सरकारनामा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

..

औरंगाबादः महाराष्ट्राचा विकास आणि येथील लोकांचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राला नेहमीच अस्थिर ठेवले, पण फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याला स्थिर सरकार मिळाले असे सांगत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मजबुत सरकार निवडूण द्या असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अंबड येथील जाहिर सभेते केले.

भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबड येथे जे. पी. नड्डा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना नड्डा म्हणाले, तुम्ही नारायण कुचे यांना दुसऱ्यांदा निवडूण देण्यासाठी इच्छूक आहात. या आधी तुम्ही योग्य बटन दाबले आणि रावसाहेब दानवे यांना प्रचंड मतांनी विजयी केले.

दानवेंनी संसंदेत योग्य बटन दाबले आणि मोदीजींनी कश्‍मिरातून 370 हटवले. मजबूत आणि स्थिर सरकार निवडूण दिल्याचा हा परिणाम आहे. मोदींची इच्छाशक्ती आणि अमित शहा यांची रणनिती यातून हे घडले. महाराष्ट्रात देखील गेल्यावेळी तुम्ही स्थिर सरकार निवडूण दिले. देवेंद्र फडणवीस यांनी आपला कार्यकाळ यशस्वीपणे पुर्ण केला.

यावेळी तुम्हाला पुन्हा एकदा राज्यात स्थिर सरकार निवडून  द्यायचे आहे, कारण मुंबईतील सरकार स्थिर नसेल तर त्याचा परिणाम फक्त राज्यावर नाही, तर दिल्लीत देखील होत असतो. महाराष्ट्राचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असल्याने मतदारांनी मजबुत सरकार पुन्हा एकदा निवडून  द्यावे असे आवाहन देखील जे.पी. नड्डा यांनी यावेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख