J. P. Nadda attacks Rahul Gandhi | Sarkarnama

राहूल गांधी पाकिस्तानचे वकील आहेत का?- जे. पी. नड्डा

सरकारनामा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

..

औरंगाबादः कश्‍मिरचा प्रश्‍न याआधी नेहरूंनी युनोत नेला, आता तीच परंपरा कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी पुढे नेते आहेत. राहूल गांधी यांच्या कश्‍मिर विषयीच्या विधानाचा वापर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुध्दच करत आहे. त्यामुळे राहूल गांधी पाकिस्तानेच वकील आहेत का? असा टोला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी लगावला.

भाजप-शिवसेना महायुतीचे फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारार्थ नड्डा यांची शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नड्डा यांनी कॉंग्रेस आणि त्यांच्या कश्‍मिर धोरणावर टिका केली.

भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी कश्‍मिरमधील 370 कलमामुळे हा भाग कसा देशापासून वेगळा समजला जात होता, तेथील नागरिकांना अधिकार नव्हता याचा उहापोह केला. आता मोदी सरकारने हे कलम हटवल्यामुळे देशात एकच कायदा लागू होईल असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

कलम 370 हटवल्यानंतर कॉंग्रेसने केलेली टिका, राहूल गांधी यांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून घेतला गेलेला गैरफायदा यावर प्रकाश टाकत नड्डा यांनी राहूल गांधीवर टिका केली. तीन तलाक आणि कलम सारख्या मुद्यावरून सरकारवर टिका म्हणचे कॉंग्रेस पक्षाची वैचारिक दिवाळखोरीच असल्याचे नड्डा म्हणाले.

महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या..

महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला कार्यकाळ पुर्ण करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. यापुर्वी कॉंग्रेस-आघाडीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये संगीत खुर्चीचा खेळ व्हायचा. कॉंग्रेसचे एखादा-दुसरा मुख्यमंत्रीच आपला कार्यकाळ पुर्ण करू शकला होता. फडवीस यांनी पाच वर्षात राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. पुन्हा त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मजबूत सरकार निवडून  द्या असे आवाहन देखील नड्डा यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका करतांना "आमचा पैलवान तेल लावून कुस्तीसाठी सज्ज आहे, पण समोर विरोधकच नाही' असे विधान केले होते. यावर शरद पवारांनी पलटवार करतांना कुस्ती पैलवांनामध्ये होत असेत अशातशाशीं नाही असे म्हटेल होते. यावर टिप्पणी करतांना पवारांचे हे विधान निराशाजनक मानसिकतेतून केले गेले असल्याचे म्हटले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख