उल्हासनगरात भाजपाचे आयलानी केली पराभवाची फिटम्फाट

 उल्हासनगरात भाजपाचे आयलानी केली पराभवाची फिटम्फाट

उल्हासनगर : पाच वर्षों 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी भाजपाचे कुमार आयलानी यांचा 1 हजार 863 मतांनी पराभव केला होता.2019 च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांनी कलानी यांचा 2 हजार 04 मतांनी पराभव करून आणि मागच्या निवडणुकीच्या तुलनेत कलानी पेक्षा 141 मते अधिक मिळवून पाच वर्षापूर्वीच्या पराभवाची फिटम्फाट केली आहे.

भाजपचे कुमार आयलानी यांना 43 हजार 666,राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना 41 हजार 662, आरपीआय बंडखोर भगवान भालेराव यांना 8 हजार 260 तर वंचीत चे साजन लभाना यांना 5 हजार 689 एवढी मते मिळाली.   

विशेष म्हणजे नोटाला मिळालेली 4871 मते ही टर्निंग ठरली आहे. आयलानी साठी त्यांची अर्धांगिनी मिना आयलानी,चिरंजीव धिरज आयलानी,भाजपाचे जमनु पुरस्वानी,महेश सुखरामानी,राजेश वधारिया, प्रकाश माखिजा,चार्ली पारवानी,मनोज लासी, राम वाधवा,प्रदिप रामचंदानी, अन्नू मनवानी, मनोज साधवानी,राजू टेकचंदानी, मंगला चांडा, अर्चना करनकाळे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, साई पक्षाचे जीवन इदनानी, टोनी सिरवानी,रिपाइ चे नाना पवार आदिंनी परिश्रम घेतले.

तर कलानी च्या विरोधात मासमीडियावर पोस्ट करणारे अपक्ष उमेदवार कमल बठिजा यांचा रोल देखील आयलानी यांच्या पथ्यावर पडला.ज्योती कलानी यांच्यासाठी कंबर कसताना आयलानी यांना निकराची झुंज देणाऱ्यात त्यांचे चिरंजीव ओमी कलानी, सासूच्या प्रचारात उघड़पणे उतरणाऱ्या भाजपाच्या महापौर पंचम कलानी, टीम ओमी कलानीचे सुमित चक्रवर्ती, अजित माखीजानी,नरेंद्रकुमारी ठाकुर, नारायण पंजाबी, पितु राजवानी, कमलेश निकम,शिवाजी रगडे, संतोष पांडे,दीपक छतलानी, दिलीप मिश्रा, माजी नगरसेविक मोहन गाडो आदिंचा समावेश आहे.

2009 सालच्या निवडणुकीत भाजपचे कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. त्यावेळी पप्पू कलानी अपक्ष उमेदवार होते पण आरपीआय पुरस्कृत होते.तेंव्हा आरपीआयचे शहर अध्यक्ष राजू सोनवणे यांनी बंडखोरी केली होती. परिणामी पप्पू कलानी यांना पराभव पत्करावा लागला होता. व कुमार आयलांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत सुद्धा तसेच चित्र निर्माण झाले होते.भगवान भालेराव यांनी बंडखोरी केल्याने 2009 ची पुनरावृत्ती होऊन कुमार आयलानी विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com