मोदी व फडणवीस सरकार खाली खेचण्याची आली वेळ : शरद पवार

मोदी व फडणवीस सरकार खाली खेचण्याची आली वेळ : शरद पवार

पुणे : सीबीआयला वेठीस धरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्या व्यक्तीचा सीबीआयवर विश्वास नाही. अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केली. लोकांना मदत न करणारे, लोकांचा विश्वास नसणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पवार यांनी तोफ डागली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. भारतीय राज्य घटनेवर हल्ले करणारेच दुर्देवाने सत्तेत आहेत. अशा लोकांनी सत्तेतून दूर करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

केंद्र व राज्य सरकारवर पवार यांनी सडकून टीका केली. राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र असून राज्य सरकार ठोस काहीच उपाययोजना करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी तीव्र होत जाणार आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. लोकांच्या अडचणीत धावून न जाणारे सरकार घालविण्याची वेळ आली आहे.

राज्य चालविणाऱ्यांनी राज्य घटनेची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, पण सत्तेचा गैरवापर करून, सातत्याने संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होतो आहे. हे घातक आहे. भाजप हुकूमशाही पध्दतीने काम करीत आहे. आम्ही सांगू तोच कायदा असेल, शबरीमल मंदिराबाबत न्यायालयाचा निकाल अंमलात आणला जात असताना, भाजप अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करीत आहेत. म्हणजे यांना न्यायालय व्यवस्था मान्य नाही, अशा लोकांच्या हाती सत्ता असणे धोकादाय आहे, असा इशारा पवार यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की मोदी हे विराट कोहलीचे ट्विट करून अभिनंदन करतात, पण मोदी महिला अत्याचाराबाबत शब्ददेखील काढत नाही, मोदी मनातून हरलले आहेत कारण पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी नवे मुद्दे नाहीत. लोकांनी भाजपला नव्हे तर मोदींना मते दिली होती. आता मोदींना निवडणुकीत हरवायचे आहे. 


माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, यांच्यासह राज्यातील सर्व नेते या वेळी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com