आमदार दत्तात्रेय भरणेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारची घेतल्याची अफवा...

आमदार दत्तात्रेय भरणेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारची घेतल्याची अफवा...

वालचंदनग : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध होवू लागल्याने आमदार भरणे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरु झाल्याने इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासह भरणे समर्थकामध्ये अस्वस्थता  पसरली आहे.

या अफवेमुळे  भरणे यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज भरावा, यासाठी कार्यकर्ते भरणेच्या निवासस्थानी एकत्र येणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार भरणे यांच्या उमेदवारीला विरोध करुन मेळावे घेवून भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामधून विरोध होवू लागल्यामुळे भरणे यांचे समर्थक   गेल्या दिवसांपासून अस्वस्थत आहेत.

मात्र आज दुपारीनंतर भरणे यांनी विधानसभा निवडणूकीमधून माघार घेतली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या निवडणूकीचे अर्ज भरण्यास शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने अद्यापही इंदापूरचा उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.  यासंदर्भात भरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. भरणे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवार (ता.३) रोजी सकाळी दहा वाजता भरणे यांच्या  निवासस्थानी जावून निवडणूक लढविण्यास गळ घालणार आहेत. यासाठी अंथुर्णे व भरणेवाडी ही दोन गावामध्ये बंद ठेवण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com