हर्षवर्धन जाधवच्या टीकेला उत्तर द्यावे एवढी त्याची लायकी नाही - चंद्रकांत खैरे

..............
 हर्षवर्धन जाधवच्या टीकेला उत्तर द्यावे एवढी त्याची लायकी नाही - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव हा वेडा माणूस आहे, त्याच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले पाहिजे तेवढी त्याची लायकी नाही, त्यामुळे यावर मी अधिक काही बोलणार नाही, माझ्या लेव्हलची व्यक्ती असेल तरच त्याला उत्तर देईन, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली. मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे थेट नाव घेऊन राज्यात तुमचा मुख्यमंत्री आहे, तेव्हा औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा, नाहीतर महापालिका निवडणुकीत तुम्हाला शहरातून फिरू देणार नाही असे खुले आव्हान दिले होते. 

यावर सरकारनामाशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या टीकेला उत्तर द्यावे एवढी त्यांची लायकी नसल्याचे म्हटले आहे. खैरे म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. 1988 मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील जाहीर सभेत बाळासाहेबांनीच या शहराला हे नाव दिले. शिवसेनेची प्रत्येक व्यक्ती तसेच हिंदुत्ववादी नागरिक या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. त्यामुळे आता केवळ अधिकृत नाव बदलणे एवढी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या शहराच्या संभाजीनगर अशा नामकरणाची घोषणा कोणत्याही क्षणी करतील हे मी यापूर्वीही सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर वरून हर्षवर्धन जाधव सारख्या व्यक्तीने शिवसेनेला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com