सरसकट कर्जमाफी म्हणाले; पण सरसकट फसवणूकच होतेय : विनायक मेटे

फसवी कर्जमाफी असून ‘राजा उदार झाला हाती भोपळा दिला’ असा मजकूर असलेल्या एका शेतकऱ्याच्या फोटोसह विनायक मेटे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.
सरसकट कर्जमाफी म्हणाले; पण सरसकट फसवणूकच होतेय : विनायक मेटे

बीड : सरकसकट कर्जमाफी म्हणाले; पण सरसकट फसवणूकच होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा सुरुवातीला करण्यात आली. नंतर, त्यात कर्जाच्या मुदती घालून देण्यात आल्या. आता त्याबाबतचा शासन निर्णय आल्याने विरोधकांकडून या कर्जमाफीबद्दल टिपण्ण्या सुरु झाल्या आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडूनच सुरुवातीपासून सातबारा कोरा केल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगीतले जायचे. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांनीही ‘दोन लाख’ त्यातही अटी घातल्याने विरोधकांना संधीच सापडली आहे. यात आता आमदार विनायक मेटे यांनीही सरसकट कर्जमाफी म्हणाले आणि सरसकट फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असा टोलाही मेटे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com