it is not saffron but tomato color says sharmila thackray | Sarkarnama

`अगं हा भगवा नाही..टोमॅटो कलरचा ड्रेस आहे...`

ज्ञानेश सावंत
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

...

पुणे : पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या मुद्दयावरून रस्त्यावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अवघी मुंबई भगवीमय झाली असली तरी; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी मात्र आपल्या अंगावर भगवा नाही तर "टोमॅटो' कलरचा ड्रेस घेतला आहे.

"आपण पहिल्यांदा भगवा ड्रेस घातलात, या प्रश्‍नावर शर्मिलावहिनी महिला पत्रकारला म्हणतात, "अगं हा भगवा नाही टोमॅटो कलर आहे.' पत्रकाराच्या प्रश्‍नावर हजरजबाबीपणाने उत्तर देत शर्मिलावाहिनी मनासून हसल्या.

राजकीय पटलावर नेहमीच आपल्या नशिबी पराभव दिसू लागल्याने मनसे अध्यक्ष राज सध्या आपला राजकीय ट्रॅक बदलण्याच्या बेतात आहेत. नवी राजकीय भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत असलेल्या राज यांनी पक्षाचा झेंडाही बदला आणि हिंदुत्वाचा मद्दा जवळ केला आहे. त्याचाच भाग भाग राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची हाक देत, राज यांनी मुंबईत रविवारी मोर्चा काढला. त्यात राज यांच्यासह त्यांचे कुटुंबियही सहभागी झाले आहे. मात्र, बहुतांशी कार्यकर्त्यांनी झेंड्याप्रमाणेच आपल्या अंगावरही भगवे कपडे घातले आहेत.

तेव्हाच, शर्मिलावहिनी दुपारी सव्वाच्या सुमारास कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर आल्या. त्यावेळी एका महिला पत्रकाराने अंगात भगवा ड्रेस घातलात ? या अनुषंगाने प्रश्‍न विचारला तेव्हा क्षणातच शर्मिलावहिनींनी नकार दिला आणि त्या म्हणाल्या, "अंग हा भगवा नाही तर माझ्या ड्रेसचा रंग हा टोमॅटो कलरचा आहे.' त्यावर त्यांच्यासह शेजारी असलेल्या त्यांच्या मैत्रिणीही हसल्या.

राज यांच्या भूमिकेबाबत शर्मिलावहिन्या म्हणाल्या, ""मनसे आणि राजसाहेबांनी आपली भूमिका बदलली नाही. मात्र, जी काही बोलायचे आहे, ते राजसाहेब बोलतील. ते काय बोलणार ? याची उत्सुकता मलाही आहे. मी त्यांची भूमिका ऐकण्यासाठी जाते. तुमच्याशी तेच बोलतील.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख