जयंत पाटलांना घाबरणार नाही, कारण आम्ही भोसले आहोत! 

जयंत पाटलांना घाबरणार नाही, कारण आम्ही भोसले आहोत! 

इस्लामपूर (सांगली) : इस्लामपूरच्या विकासकामांच्या संदर्भात आमदार जयंत पाटील यांनी समोरासमोर येऊन लढण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज दिले. जयंत पाटील इस्लामपूरचे मतदार नाहीत, त्यामुळे त्यांना इस्लामपूरच्या विकासाशी देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, जयंत पाटील यांच्या दबावाच्या राजकारणाला आता कुणी घाबरणार नाही. कारण आम्ही भोसले आहोत. हलक्‍या कानाने कुणाचेही काहीही ऐकून मत न मांडता त्यांनी आता सल्लागार बदलावेत, असा टोलाही नगराध्यक्ष पाटील यांनी लगावला. 

निशिकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेतील भाषणावर राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला पत्रकार परिषदेत प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, "जयंतरावांचे समर्थक दादासो पाटील आणि शहाजी पाटील हे पालिकेत असूनही त्यांना वस्तुस्थिती माहीत नाही, हे दुर्दैवी आहे. डिसेंबर 2016 पासून 127 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर व काहींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पैकी 40 कोटी 32 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. एकूण 52 कोटी रुपये बॅंकांमध्ये आहेत. शहरातील विकासावर, दर्जेवर, नियोजनावर चर्चा होणे अपेक्षित असताना दुर्दैवाने कामे अडवण्यात यांना रस आहे. 15 वर्षे मंत्रिपद असूनही शहराला जोडणारा एकही रस्ता चौपदरी का झाला नाही? भुयारी गटर योजनेवर दोन निवडणूका जिंकून सत्तेत येऊनही ती पूर्ण का केली नाही? जयंत पाटलांच्या मंत्रिपदाचा उपयोग तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेला काय झाला? याचे त्यांनी उत्तर द्यावे. संस्था उभारणी आणि चालविण्याचा त्रास त्यांना माहीत नाही. उलट त्यांनी अण्णासाहेब डांगे, नागनाथअण्णा, विलासराव शिंदे यांना त्रास दिला. यापुढे त्यांचे दबावाचे राजकारण चालू देणार नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com