शिवसेनेला वाटते की ते सत्तेतून बाहेर पडले की आम्ही सत्तेत जाऊ : जयंत पाटील 

शिवसेनेला वाटते की ते सत्तेतून बाहेर पडले की आम्ही सत्तेत जाऊ : जयंत पाटील 

इस्लामपूर (सांगली) : फडणवीस सरकारमध्ये एकसंधपणा नाही. शिवसेनेला वाटते की ते सत्तेतून बाहेर पडले की आम्ही सत्तेत जाऊ. पण राष्ट्रवादीला सत्तेत रस नाही. शरद पवारांनी सुरवातीला पाठिंब्याचे विधान केल्यामुळे दोघांमधली अस्वस्थता आजवर कायम राहिली, असे मत राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्‍त केले. 

विधानसभा अधिवेशनानंतर त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, विरोधकांचे तोंड बंद करणे, जाहीर चर्चेत प्रसंगी माईक बंद करणे किंवा थातुरमातुर उत्तरे देऊन मूळ मुद्द्याला बगल देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'स्टाईल' आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वतःच्या गृह खात्यावर वाचक नाही. काही अट्टल गुन्हेगार त्यांचे जवळचेकार्यकर्ते आहेत. 2 वर्षांपूर्वी अशा गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन देऊनही पाळलेले नाही. त्याचा जाब विचारला तर त्याकडे दुर्लक्ष केले. गुन्हेगार पोलिसांचा मुद्दा टाळला. त्यांच्या मंत्रिमंडळातील 22 मंत्री वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यानी क्‍लिनचीट दिली आहे. अडचणीचे प्रश्न आले की ते बगल देतात. मागचे काही काढू नका म्हणतात. केवळ पार्टी चालवणे इतकाच उद्योग सध्या सुरु आहे. 

ते म्हणाले, "नारायण राणेंना मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हेच मुख्यमंत्री शिवसेनेला एक आणि राणेंना वेगळेच सांगत आहेत. ते दोघांनाही खेळवत आहेत. राणेंना मंत्रिमंडळात स्वीकारण्याची वेळ सेनेवर आली तर नक्कीच शिवसेनेचे भाजपमध्ये काहीतरी 'घोंगडे' अडकले असण्याच्या शंकेला वाव आहे. राणेंसाठी आता कुणाच्या बाजूने विश्वासार्हता जपायची हा त्यांच्यासमोर पेच असावा. अधिवेशनात सेना तटस्थ, बघ्याच्या भूमिकेत होती. शिवसेनेला विश्वासात घेऊन सरकारचे कोणतेही निर्णय होताना दिसत नाहीत. तरीही शिवसेना सत्तेत का राहिली आहे, हा प्रश्नच आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com