'घरकुल'चे चार्टशिट न्यायालयात सिध्द झाले हे तपासाचे यश : ईश्‍यू सिंधू

.
Ishu-Sindhu
Ishu-Sindhu

जळगाव :  न्यायालयात चार्टशिट सिध्द होणे हेच तपास  अधिकाऱ्याचे यश असते.  'घरकुल'प्रकरणाच्या या निकालावरून तेच सिध्द झाले आहे. यातून जळगावकरासह सगळ्यांनाच न्याय मिळाला,  अशी प्रतिक्रीया तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी व नगरचे विद्यमान पोलीस अधिक्षक ईश्‍यू सिंधू यांनी व्यक्त केली. 

जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर ईश्‍यू सिंधू यांची सन 2010 नियुक्ती झाली. 11 जुलै 2011 आला त्यांची घरकुल गुन्ह्याच्या तपासिधकारीपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी चौकशी करून त्यांनी 28 जानेवारी 2012ला महापालिकेचे माजी महापौर प्रदीप रायसोनी, मक्तेदार राजा मयुर, नाना वाणी व पालिकेचे मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक करण्याची पहिली कारवाई केली.

 त्यानंतर त्यांनी पुढील तपास करून 11 मार्च 2012ला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना अटक केली, त्यानंतर तत्कालीन मंत्री गुलाबराव देवकर यानाही अटक केली. त्यामुळे पोलीस विभागात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. 

आजच्या निकालाबाबत बोलतांना  ईश्‍यू सिंधू  म्हणाले, पोलीस अधिकाऱ्याने तपास करून दाखल केलेले चार्टशिट सिध्द होणे ही त्यांची मोठी उपलब्धी असते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर कागदपत्राची तपासणी केली, गुन्ह्यातील प्रत्येक घटनेची साखळी जोडत जावून त्यांतून संशयीताची जबाबदारी निश्‍चित करून आणि त्या आधारावर दोषारोपपत्र तयार केले. 

हे दोषारोप न्यायालयात सिध्द झाले हीच मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे. यात आपल्यासोबत सहकारी म्हणून पोलीस अधिकारी (कै.)नितीन नेहूल यांनी आपल्याला मोठी साथ दिली. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले आज ते हयात असायला हवे होते. न्यायलयाच्या आजच्या निकालामुळे जळगावकरासह सर्वानाच न्याय मिळाला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com