रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधीची सिंचन विभागाला लागली चिंता

राज्यात सिंचन विभागाचे सुमारे 313 प्रकल्प निधीभावी रखडले आहेत. या निधीसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या आसपास निधीची गरज आहे. मात्र इतक्‍या मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करायचा नेमका कोठून, याची चिंता सिंचन विभागाला लागली आ
Irrigation Deparment in Worry of Funds to Complete Projects
Irrigation Deparment in Worry of Funds to Complete Projects

मुंबई : राज्यात सिंचन विभागाचे सुमारे 313 प्रकल्प निधीभावी रखडले आहेत. या निधीसाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या आसपास निधीची गरज आहे. मात्र इतक्‍या मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करायचा नेमका कोठून, याची चिंता सिंचन विभागाला लागली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाकरिता 10,235 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतूद अत्यल्प असल्यामुळे रखडलेल्या प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. तसेच आर्थिक निधीसाठी केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र केंद्राकडून इतकी मदत मिळेल, याची शक्‍यता धुसर असल्याचे सिंचन विभागातील अधिका-यांचे मत आहे.

सदयस्थितीत राज्यात रखडलेले 313 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता एक लाख नऊ हजार कोटींची गरज आहे, असे जलसंपदा विभागाचे मत आहे. यंदा 10 हजार कोटींची तरतूद केली असली तरीही तो सरसकट निधी वापरता येणार नाही. राज्यपालांच्या निर्देशानुसार हा निधी खर्च करावयाचा आहे. त्यामुळे ठराविक प्रकल्प पुर्ण करायचे झाले तरीही काही वैधानिक अडचणी निर्माण होणार आहेत. यावर मार्ग काढताना सिंचन विभागाचा कस लागणार आहे.

रखडलेल्या प्रकल्पामध्ये विदर्भात 123 प्रकल्पांचा समावेश असून त्यासाठी 43 हजार 560 कोटी, मराठवाडयात 55 प्रकल्पांसाठी 16 हजार 385 कोटी, उर्वरित महाराष्ट्रातील 135 प्रकल्पांचा समावेश असून त्यासाठी 49 हजार 444 कोटी इतक्‍या निधीची गरज जलसंपदा विभागाला भासणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com