शिवस्मारकातला भ्रष्टाचार गाजणार; भाजपची कोंडी करण्यासाठी सत्ताधारी आक्रमक

शिवस्मारक कामात भ्रष्टाचार झाला याचा पर्दाफाश आम्ही केला आहे त्यामुळे हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडून भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
ShivSmarak Issue will be Surfaced in Nagpur Assemly Session
ShivSmarak Issue will be Surfaced in Nagpur Assemly Session

मुंबई : शिवस्मारकाच्या निवीदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाल्याचा ठपका 'कॅग'च्या अहवालात ठेवण्यात आला असून सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार विधीमंडळात आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत.आज (ता.17) ला या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपची कोंडी करण्याची रणनिती सत्ताधारी पक्षाने आखली आहे.

शिवस्मारक कामात भ्रष्टाचार झाला याचा पर्दाफाश आम्ही केला आहे त्यामुळे हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडून भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शिवस्मारकाबाबत बोलताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्षाचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे.

याप्रकरणी सरकारने चौकशी समिती स्थापन करावी आणि चौकशीत चंद्रकात पाटील यांनी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध करुन दाखवणारच असे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ''मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्‍चित केली होती. मात्र, भाजपाचे सरकार आल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. परंतु अजूनही तिथे काम सुरु झालेले नाही. निविदा काढण्यात आली. फेर निविदा काढून पुन्हा ठेका देण्यात आला. त्याप्रक्रियेत फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे सार्वजनिक खात्यातील अधिकारी यांनी कॅगला कळवले होते. वरिष्ठ इंजिनिअर ऑर्डर द्यायला तयार नव्हते. शेवटी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ती वर्कऑर्डर दिली होती. ही कागदपत्रे आहेत. मी आणि कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी दोनवेळा प्रेस घेवून जनतेसमोर आणले आहे,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

''कॅगने अहवाल दिल्यानंतर शिवस्मारकात भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होत आहे.चंद्रकात पाटील त्याकाळात मंत्री होते. त्यांनीच यात हात धुतला होता. ज्यावेळी आम्ही प्रेस घेवून ट्‌वीट केले. त्यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी केली होती. भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना खुलासा नीटपणे करता आला नाही. आज सांगत आहेत की स्मारकाचे काम थांबवण्यासाठी केलं जात आहे परंतु स्मारकाची कामेच सुरु झालेली नाही. स्मारक हे होणारच परंतु यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहात मांडणार आहे,'' असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com