IPS सतीश खंडारे बनले लडाखचे पहिले पोलीस महासंचालक

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर आज उपराज्यपालांसह इतर महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
IPS सतीश खंडारे बनले लडाखचे पहिले पोलीस महासंचालक

पुणे: लडाखचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून अमरावतीचे सुपुत्र सतीश खंडारे यांची नियुक्ती झाली आहे. पुणे शहरातील झोन 3 च्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांचे ते पती आहेत.

सतीश पुणे येथील सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन 1992 मध्ये बीई झाले आहेत.  1995 मध्ये ते आयपीएस बनले. काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला. जम्मू काश्मीर येथे सेवारत असलेल्या खंडारे यांनी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात सात वर्षे सेवा दिली. 2005 मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, नवी मुंबई भागातील खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com