ips sandeep pati about dysp vijay chaudhari | Sarkarnama

SP संदीप पाटील म्हणाले, 'तुम्हाला हिंदकेसरी व्हायचं आहे एवढं लक्षात ठेवा'! 

संपत मोरे 
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

संदीप पाटील यांनी केलेल्या कौतुकामुळे माझा आत्मविश्वास वाढला,त्यांच्या शब्दांनी मला बळ मिळालं. मी त्यांना हिंदकेसरी होण्याचा शब्द दिलाय त्यासाठी मी खूप मेहनत करेन.मला मिळालेल्या संधीचे सोने करेन.

- विजय चौधरी 

पुणे : "पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला सांगितले. तुम्हाला हिंदकेसरी व्हायचं आहे एवढं लक्षात ठेवा, तुम्ही नोकरीही करायची आणि कुस्तीही' प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक आणि तिहेरी महाराष्ट्र केसरी विजय चौधरी सांगत होते. 

विजय चौधरी यांनी पदावर रुजू झाल्यानंतर संदीप पाटील यांची भेट घेतली. या भेटीत पाटील यांनी चौगुले यांच्या आजवरच्या कुस्तीतील यशाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले ,"पोलीस खात्यात काम करण्यासाठी खिलाडू वृत्तीची गरज असते. खिलाडू वृत्तीची माणसं पोलीस खात्यात सक्षमपणे काम करू शकतात. विजय चौधरी यांच्यासारखे नामांकित कुस्तीपटू या खात्यात आल्यावर नक्कीच त्यांच्या कौशल्याचा वापर करत समाजाची घडी बसवू शकतात. विधायक बळाची समाजाला नेहमीच आवश्‍यकता असते.बळाचा वापर नेहमी सज्जनांच्या रक्षणासाठी करायचा असतो ही आपल्या मल्लविद्येची शिकवण आहे याच कुस्ती परंपरेतील एक बलवान आणि विनम्र पैलवान आमचा सहकारी झालाय याचा आनंद वाटतो. ' 

विजय यांनी नोकरी करत असताना कुस्तीमेहनत करावी. त्यानी हिंदकेसरी व्हावेच पण कुस्तीत जागतिक कीर्तीचे यश मिळवावे. ते कुस्तीच्या माध्यमातून पोलीस खात्याची मान उंच करतील एवढी क्षमता त्यांच्यात आहे., असेही संदीप पाटील म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख