37 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे झोन 3 चे DCP बनले गोंदियाचे SP

संदीप दिवाण यांची बदली सीआय़डीत (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
37 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे झोन 3 चे DCP बनले गोंदियाचे SP

पिंपरी (पुणे): राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या. त्यात प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त (झोन 3) मंगेश शिंदे आणि एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांचा बदली झालेल्यांत समावेश आहे.

दिवाण यांची बदली सीआय़डीत (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबईतून (मुख्यालय उपायुक्त) राजेश बनसोडे बदलून आले आहेत.

पुणे पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त (झोन 3) मंगेश शिंदे यांची गोंदियाचे अधीक्षक म्हणून बदली केली गेली आहे. तर, मुंबई येथील राज्य पोलिस मुख्यालयातील सहाय्यक महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुधीर हिरेमठ यांची उपायुक्त (झोन 2),पिंपरी-चिंचवड येथे नेमणूक झाली आहे.

बदली झालेले इतर अधिकारी असे : नाव व कंसात कोठून कोठे
 

डॉ. हरीबालाजी एन. (अप्पर पोलिस अधिक्षक तथा अॅडीशनल एसपी, गडचरोली ते पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण), हर्श पोद्दार (पोलिस उपायुक्त, नागपूर ते पोलीस अधिक्षक, बीड), अमोघ गांवकर (पोलीस अधिक्षक, रेल्वे नागपूर ते पोलीस अधिक्षक, अकोला), पंडीत एम. कमलाकर (अप्पर पोलीस अधिक्षक, गडचरोली ते पोलीस अधिक्षक, नंदूरबार), संदीप घुगे, सहायक पोलीस अधिक्षक ते अप्पर पोलीस अधिक्षक, मालेगाव,नाशिक ग्रामीण पदोन्नतीने), मनीष कलवानिया (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलीस अधिक्षक, गडचरोली,पदोन्नती), श्रीमती रागसुधा आऱ. (सहायक पोलीस अधिक्षक ते अप्पर पोलीस अधिक्षक, परभणी, पदोन्नतीवर), भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधिक्षक ते अपर पोलीस अधिक्षक, जळगाव पदोन्नतीने), नुरुल हसन (सहायक पोलीस अधिक्षक ते अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ,पदोन्नतीने), अतुल कुलकर्णी (सहायक पोलीस अधिक्षक ते अपर पोलीस अधीक्षक, अकोला,पदोन्नतीने), निखील पिंगळे (अपर पोलीस अधिक्षक,व र्धा ते अप्पर पोलिस अधिक्षक, गोंदिया), जी. श्रीधर (पोलिस अधीक्षक तथा एसपी, बीड ते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.13, वडसा देसाईगंज), चंदर किशोर मीना (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.8, मुंबई ते पोलीस उपायुक्त, मुंबई), राकेश कलासागर (एसपी, अकोला ते  एसपी, सीआय़डी,पुणे),  प्रणय अशोक (कमांडट तथा समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (एसआरपी), गट क्र.4, नागपूर ते डीसीपी,मुंबई), रंजन शर्मा (एसपी, सीआयडी, नागपूर ते डीसीपी, मुंबई), अंकित गोयल (डीसीपी, झोन 2, ठाणे ते डीसीपी,मुंबई), विनीता साहू (एसपी, गोंदिया ते पोलिस उपायुक्त, मुख्यालय, नवी मुंबई), प्रवीण पाटील (मुख्य सुरक्षा अधिकारी, विधानमंडळ सचिवालय, मुंबई ते पोलिस उपायुक्त, गुन्हे, नवी मुंबई), निलोत्पल (अप्पर पोलीस अधिक्षक, मालेगाव, नाशिक ग्रामीण ते डीसीपी झोन 5, नागपूर), प्रशांत होळकर (डीसीपी, राज्य गुप्तवार्ता विभाग तथा एसआयडी, मुंबई ते डीसीपी अमरावती), निवा जैन (एसपी, सीआ़यडी, अमरावती ते कमांडट, एसआरपी, पुणे), डॉ. अक्षय ए. शिंदे (अप्पर पोलिस अधिक्षक, नांदेड ते कमांडट, एसआरपी गट क्र. 3,जालना), लोहित मतानी (अप्पर पोलीस अधिक्षक, जळगाव ते कमांडट, एसआरपी गट क्र.9, अमरावती), निमित गोयल (अप्पर पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग ते कमांडट, एसआऱपी गट क्र. 8, मुंबई), संजय पाटील (एसपी, नंदूरबार ते कमांडट, एसआरपी, गट क्र.6, धुळे), सुरेशकुमार मेंगडे (डीसीपी, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते डीसीपी, नवी मुंबई), विक्रम देशमाने (डीसीपी, झोन 5, मुंबई ते एसपी, गुप्तवार्ता कक्ष, दहशतवाद प्रतिबंधक विभाग,मुंबई), सुधाकर पठारे, डीसीपी, झोन 1, नवी मुंबई ते डीसीपी, एसआयडी), सचीन पाटील (डीसीपी, मुख्यालय, मुंबई ते कमांडट,एसआरपी, नवी मुंबई), अरविंद चावरिया (कमांडट,एसआरपी,गट क्रं.1, पुणे ते एसपी, एसीबी ,औरंगाबाद), विजय मगर (एसपी, नागरी हक्क संरक्षण,नाशिक ते डीसीपी, मुख्यालय, सोलापूर) आणि अभिषेक त्रिमूखे (डीसीपी, झोन 1, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, राज्य पोलिस मुख्यालय,मुंबई). 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com