शालेय साहित्य खरेदीतील "त्या' लिपिकांची आयुक्तांकडून चौकशी सुरु

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयाची खरेदी होवू लागली आहे. त्या शालेय साहित्य खरेदीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळून आल्याने तत्कालिन अधिकारी-कर्मचा-यांच्या चौकशी करण्यात येणार आहे
Inquiry of Clark Responsible for Purchase of Education Department
Inquiry of Clark Responsible for Purchase of Education Department

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयाची खरेदी होवू लागली आहे. त्या शालेय साहित्य खरेदीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळून आल्याने तत्कालिन अधिकारी-कर्मचा-यांच्या चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी हे चौकशीच्या फे-यातून सुटले असून त्यात पालिकेचे तत्कालिन टेंडर लिपिक अडकले आहेत. त्या लिपिकांने खरेदी केलेल्या शालेय साहित्य खरेदीची आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत पुर्वी शिक्षण मंडळ हे स्वतंत्र कार्यान्वित होते. त्या शिक्षण मंडळावर सत्ताधारी पक्षाकडून सभापती व सदस्य पदावर वर्णी लागत होते. शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अर्थसंकल्प असल्याने त्यांना खरेदीचे अधिकार होते. यामुळेच महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयाची खरेदी शिक्षण मंडळ करत होते. त्या कारणामुळेच प्रतिनियुक्तीवर असलेले तत्कालिन अतिरिक्त आयुक्त, प्रशासन अधिकारी, टेंडर लिपिक त्या सर्वांची चांदीच असायची. त्यांनी नियमबाह्यपणे कोट्यावधी रुपयांची शालेय साहित्य खरेदी केल्याने शालेय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार व अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले असून त्यानंतर शिक्षण समिती स्थापत्य करण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षण मंडळाच्या कार्यकाळात प्रतिनियुक्त असलेले तत्कालिन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शिक्षण प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर, तत्कालिन टेंडर लिपिक गिरीष सलगर हे कार्यरत होते. या अधिकारी व कर्मचा-यांच्या कार्यकाळात शालेय साहित्य खरेदीत प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या निदर्शनास आला आहे. त्या काळातील शालेय साहित्यांची चौकशी करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहे. परंतू, प्रतिनियुक्तीवर असलेले अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे हे सेवानिवृत्त झालेले आहे. तर प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर हे पुन्हा शासन सेवेत गेले आहेत. त्यामुळे पालिकेचे लिपिक असलेले गिरीष सलगर यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचीच चौकशी होणार आहे. त्यांच्या चौकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com