मावळचे  तहसीलदार मधुसुदन बर्गे अ़डचणीत; लाचलुचपत विभागाने महसूलकडे मागितला अभिप्राय 

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात लाचलुचपत विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अजय आफळे यांनी महसूल विभागाकडे तसा अभिप्राय मागितला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केलेल्या कार्यवाहीमुळे तहसीलदार बर्गे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र आपल्याकडून काहीच चूक झाला नसल्याचा दावा बर्गे यांनी केला.
Inquiry Against Maval Tehsildar Madhusudan Barge
Inquiry Against Maval Tehsildar Madhusudan Barge

पंढरपूर : शेत रस्ता प्रकरणातील  निकाला संदर्भात पंढरपूरचे तत्कालीन आणि सध्या मावळ येथे कार्यरत असलेले  तहसीलदार मधुसूदन बर्गे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकाच प्रकरणी दोन वेगवेगळे निकाल दिल्याने त्यांची खातेनिहाय  चौकशी  सुरु आहे. याच दरम्यान  लाचलुचपत विभागानेही  या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे.

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात लाचलुचपत विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अजय आफळे यांनी  महसूल विभागाकडे तसा अभिप्राय मागितला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केलेल्या कार्यवाहीमुळे तहसीलदार बर्गे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.  

केसकरवाडी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी रामचंद्र नामदेव केसकर आणि श्रीरंग विठु केसकर यांच्यात  शेत रस्त्यावरुन वाद सुरु आहे. हे प्रकरण तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या समोर आले होते. त्यावेळी श्री. बर्गे यांनी  प्रत्यक्ष शेत रस्त्याची  पाहाणी करुन रामचंद्र नामदेव केसकर यांच्या बाजूने निकाल दिला होता.

त्यानंतर याच  प्रकरणात 18 जुलै 2019 रोजी श्री. बर्गे यांनी  पुन्हा  विरोधी निकाल दिला आहे. याप्रकरणात तहसीलदार श्री.बर्गे यांनी आर्थिक हितसंबंध जोपासून चुकीच्या पध्दतीने निकाल दिल्याची तक्रार रामचंद्र केसकर यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली होती. आय़ुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश  तत्कालीन  जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांना दिले होते.

जिल्हाधिकारी डाॅ.भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तत्काळ कार्यवाही सुरु केली.  त्यानंतर  याप्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. श्री.ढोले यांनी चौकशी अहवाल महसूल प्रशासनाला पाठवला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही ही दखल घेतली आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य असल्याची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने  तहसीलदार बर्गे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडे तसा अभिप्राय मागितला आहे. या संदर्भात लाचलुचपत विभागाने 8 जानेवारी रोजी तसे लेखी पत्र महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. 

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास  भ्रष्टाचार  प्रतिबंधक अधिनियम 1998चे कलम 17 (अ) प्रमाणे  पुढील कारवाईसाठी आदेश द्यावेत  असेही अपर पोलिस अधीक्षक श्री. आफळे यांनी महसूल विभागाला दिलेल्या पत्रात पत्रात नमूद केले आहे. तहसीलदारांच्या  विरोधातील  तक्रारीची महसूल आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच वेळी दखल घेवून कार्यवाही सुरु केल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मात्र आपण एकच आदेश दिला होता. क्लार्कच्या नजरचुकीने दोन आॅर्डर टाइप झाल्या होत्या. मात्र त्यातील निर्णय एकच होता.  प्रत्यक्षात टपालानेही एकच आॅर्डर गेली. माझी विभागीय चौकशी सुरू झाल्याचे मला तरी माहिती नाही. कारण मला तसे कोणी कळविलेले नाही. तसे असते तर मला यात माझी बाजू मांडण्याची संधी मिळाली असती. या प्रकरणात माझ्याकडून कोणतीही गफलत झालेली नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य नाही, हे मी खात्रीने सांगतो, असे बर्गे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com