गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी : जयंत पाटील

ईव्हीएम मशीनमधील घोट्याळ्यामुळेच (कै.) गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचे परदेशातून एकाने सांगितले, हे मोठे आश्चर्य आहे. येथील सीबीआय चौकशी भाजपने गुंडाळली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी : जयंत पाटील

नगर : ईव्हीएम मशीनमधील घोट्याळ्यामुळेच (कै.) गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचे परदेशातून एकाने सांगितले, हे मोठे आश्चर्य आहे. येथील सीबीआय चौकशी भाजपने गुंडाळली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले, "भारतीय जनता पक्ष देशात हुकुमशाही पद्धती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंडे यांच्या अंत्यविधीच्या वेळीच हजारो कार्यकर्त्यांना त्यांच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यांचा उद्रेकही होऊ लागला होता. काल एका अभियंत्याने गौप्यस्फोट करून मुंडे यांची व इतर १२ जणांची हत्या झाल्याचे जाहीर केले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. निवडणूक आयोग कितीही स्पष्टीकरण करीत असले, तरी आता लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे सर्व पक्षांनीही ईव्हीएम मशीनवर मतदान घेवू नये, अशी मागणी केली आहे. केवळ भाजप एका बाजुने आणि सर्व पक्ष दुसऱ्या बाजुने असताना आता विचार करण्याची वेळ आली आहे."

ते पुढे म्हणाले, "मुंडे यांच्या अपघातानंतर गाडी चालविणाऱ्या चालकावर कारवाई का झाली नाही, जी दुसरी गाडी होती, त्या गाडीचालकावर काय कारवाई झाली, याबाबत कुठेही स्पष्टता नाही. २०१४ मधील निवडणुकांत ज्यांनी या मशिनचा फायदा घेतला, तेच मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. काही लोक हुकुमशाही पद्धतीने देशावर वर्चस्व करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी होण्याची गरज आहे." येथे भाजप सरकारच्या दबावामुळे ही चौकशी चोखपणे होणार नाही. त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय एजन्सीने करावी, अशी आपली मागणी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com