पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या : गिरीश महाजन 

केंद्रातील व राज्यातील सरकार सर्वाच घटकांचा विचार करून काम करीत आहे.शेवटच्या घटकाला शौचालय पाहिजे म्हणून प्रत्येक शौचालय देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच प्रत्येकाच्या घरी गॅस, तसेच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत, असे भाजपचे #प्रभावीनेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केले.
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या : गिरीश महाजन 

जळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम चांगले सुरू आहे. अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार देशात व राज्यात आले आहे. असे मत राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यानीं 'सरकारनामा' लाईव्ह मुलाखतीत व्यक्त केले. मी आजपर्यंत पक्षाने जे सांगितले ते मनापासून केले, असेही त्यांनी सांगितले. 

जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी मुलाखत घेण्यात आली. 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधाला, यावेळी महाजन यांनी त्यांचा राजकीय जीवनपट उलगडला. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यावेळी बोलतांना म्हणाले, "केंद्रातील व राज्यातील सरकार सर्वाच घटकांचा विचार करून काम करीत आहे.शेवटच्या घटकाला शौचालय पाहिजे म्हणून प्रत्येक शौचालय देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच प्रत्येकाच्या घरी गॅस, तसेच शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रातही जागातील सर्वात मोठी पाच लाखापर्यंत वैदयकिय मदत देण्याची योजना राबविण्यात आली. राज्यातही मुख्यमंत्री सहाय्यता निधीची योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतीबा फुले योजनेच्या माध्यमातून सहाय्यता केली. सर्वाच घटकांचा विचार करून केंद्र व राज्यातील सरकार काम करीत आहे." 

त्यांच्याशी झालेली आणखी काही प्रश्नोत्तरे अशी - 

प्रश्‍न : आरोग्याचे व्हिजन कसे निर्माण केले? 
उत्तर : मी संघाचा स्वंयसेवक आहे, महाविद्यालयानी जीवनापासून आपण मदतीचे कार्य करीत आहोत. आपला तो स्वभावच आहे. प्रत्येकाला मदत करणे हा आपला स्थायी भाव आहे. त्याच माध्यमातून आपण मदत करीत असतो. आमदार झाल्यानंतर आपण मुंबईत लोकांना उपचार करण्यासाठी कार्य केले, त्यासाठी आमदार निवासात राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. डॉ. दौलतराव आहेर आरोग्यमंत्री असतांना आपण योजना काढली होती. त्या माध्यमातूनही आपण ग्रामीण भागात रूग्णांना मदत मिळवून दिली. साडेतीन लाखांच्यावर रूग्णांना उपचार मिळवून दिले आहे. आता तर माझ्याकडे तेच खाते आहे. शिबीराच्या माध्यमातून आपण आदिवासी, दुर्गम भाग वाड्या वस्त्यावर जावून मदत केली आहे.मुंबईचे मोठ मोठे डॉक्‍टर आणून या शिबीराच्या माध्यमातून उपचार करून दिले आहे. तसेच ज्यांना गरज आहे. त्यानां मुबंईत ऑपरेशन करून दिले आहे. आम्ही खूप मोठे पुण्याच काम केले आहे. सी.एसआरच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत. राज्यभर आम्ही वैद्यकिय शिबीरे घेत आहोत. तसेच सीएसआरच्या माध्यमातून मोफत उपचार करीत आहेत. 

प्रश्‍न : तुम्हाला सरकारचे संकटमोचक म्हटले जाते त्याचे रहस्य काय? 
उत्तर : मी पक्षाचा आणि चळवळीतील कार्यकर्ता आहोत. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिपणे पार पडतो. आपण सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहोत. पक्षामुळे मोठ्या पदावर गेलो. पक्षाने आम्हाला खूप दिले. परंतू, आपण पक्षाला काय दिले? याचा विचार केला. आमचीही काही जबादारी आहे. नुसता रूबाब दाखविणे योग्य नाही. पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री जो आदेश देतील तो आपण पाळत असतो. अगदी शेतकरी आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, लालबावटाचे आंदोलन असो की राजू शेट्टी व अण्णा हजारे यांचे आंदोलन असोत वा पालघरची निवडणून असो, मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडीत असतो. पक्षाने संधी दिल्याने आपण मोठे झालो आहोत. सन 1995 मध्ये (कै.) प्रमोद महाजन यांनी जामनेर मधून ईश्‍वरबाबूजीं विरूध्द उमेदवारी दिली त्यावेळी ते मोठे नेते होते मी साधा कार्यकर्ता होतो. परंतू, त्यांनी मला लढण्याचे आदेश दिले मी लढलो. पहिल्यांदा संधी मिळाली त्याचे मी सोने केले. पालघर लोकसभा मतदार संघात भाजपच्या दिवंगत खासदाराच्या मुलालाच शिवसेनेने पक्षात प्रवेश देवून उमेदवारी दिली त्यावेळी पक्षापुढे मोठे आव्हान होते. त्यावेळी आपल्या पक्षाने जबाबदारी दिल्याने आपण त्या ठिकाणी जावून तेथील आमदारांशी चर्चा करून तसेच कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाचा उमदेवार निवडून आणला. फक्त पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com