भंडारा नगराध्यक्ष पदाच्या वाद पेटला... भाजप नगराध्यक्ष विरोधात पक्षाच्याच नगरसेवकाने थोपाटले दंड

भंडारा नगर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नितीन धकाते यांनी भाजप नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत घराचा आहेर दिला आहे
Bjp Corporator Allegations on Bhandar MP And City President Sunil Mendhe
Bjp Corporator Allegations on Bhandar MP And City President Sunil Mendhe

भंडारा : भंडारा नगर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नितीन धकाते यांनी भाजप नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत घराचा आहेर दिल्याने भंडारा नगराध्यक्ष पदाच्या वाद आता शिगेला पोहचला आहे.

नगरसेवकाने लावलेले सर्व आरोप हे खोटे असून या नगरसेवकाने स्वतःच भरपूर आर्थिक घोटाळे केले असून या घोटाळ्यामुळे त्यांना नुकतीच तुरुंगवारी करावी लागली आहे, तसेच त्यांनी पक्षाचे व्हिप सुद्धा नाकारले त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत ही कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

मागील तीन वर्षे अगोदर पहिल्यांदाच भंडारा नगरपरिषद वर भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे सुनील मेंढे हे निवडून आले।तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे नगराध्यक्ष भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे  खासदार म्हणून निवडून आले।ते खासदार झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील असं नगरसेवकांना वाटतं होते. मात्र, नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने भाजपामध्ये धुसफूस सुरू झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून 8 दिवसापूर्वी  झालेल्या उपाध्यक्ष च्या निवडणुकीत आणि सभापतीच्या निवडणुकीत दिसून आले.

 सत्ता भाजपाची असूनही अपक्ष असलेल्या दिनेश भुरे यांना उपाध्यक्ष बनण्यासाठी समर्थन द्यावे लागले।तर सभापतीच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन आणि भाजपा समर्थित एक अपक्ष अशा तीन लोकांनी बंडखोरी केल्याने भाजपाच्या दोन सभापतींना पराभवाचा तोंड पाहावं लागलं. मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही. तर भाजपाचे बंडखोर नगरसेवक नितीन धकाते यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष आणि खासदार असलेल्या सुनील मेंढे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

मी भाजपच्या विरोधात नाही तर नगराध्यक्ष यांच्या कामाच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिल्यास भाजपाकडे असलेल्या संख्याबळानुसार भाजपाचा अध्यक्ष पुन्हा होईल. मात्र अध्यक्षांनी स्वतःहून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला जाईल. यासाठी 36 पैकी 27 नगरसेवक पाठिंबा देतील, असे या नगरसेवकांनी सांगितले. मात्र पत्रकार परिषदेमध्ये ते स्वतः एकटेच उपस्थित होते हे विशेष

''आरोप लावणारा हा नगरसेवक स्वतः बांधकाम व्यवसाय करतो या व्यवसायात त्यांनी बरेच आर्थिक घोटाळे केले असल्याने या नगरसेवकाला नुकतीच तुरुंगवारी करावी लागली. यावेळेस मी त्याला कोणतीही मदत केली नाही तसेच या नगरसेवकाची उपाध्यक्ष पदासाठी इच्छा होती. मात्र या प्रकरणामुळे भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी याला उपाध्यक्ष पदासाठी ना मंजुरी दिली आणि या सर्व कारणाने बिथरलेल्या या नगरसेवकाने माझ्यावर गैरव्यवहाराचे खोटे आरोप केले आहेत.''असे सुनील मेंढे यांनी सांगितले.

या आरोपाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी स्वतः केली आहे. पार्टी विरुद्ध काम केल्याने आणि पार्टीचे विप नाकारल्याने पक्षाच्या नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही करणार आहोत. तसेच त्यांनी केलेले सर्व आर्थिक घोटाळे याचीही चौकशी लावण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

हातातून सत्ता गेल्या पासून भाजप पड़झड सुरुच आहे. आपल्या विरोधकांच्या प्रश्नांना समर्थपने तोंड देणारी भाजप आता स्वता पक्षातुन विरोधाला सामोर जावे लागल्याने या समस्येला कसे पार लावते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com