industry persons from junnar supports benake | Sarkarnama

वल्लभ बेनकेंनी शेतकऱ्यांना उद्योजक केले...उद्योजकांनी अतुल यांना उचलून धरले

रवींद्र पाटे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नारायणगाव : "कांदळी (ता. जुन्नर) औद्योगीक वसाहतीची स्थापना करून माजी आमदार वल्लभ बेनके यांनी शेतकरी कुटुंबातील पन्नास मुलांना उद्योजक होण्याची संधी दिली आहे. जुन्नर तालुक्‍याच्या शाश्‍वत विकासाला त्यांनी चालना दिली आहे. आघाडीचे उमेदवार अतुल बेनके हे उच्च शिक्षित व विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे वसाहतीमधील साठ उद्योजकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे,'' अशी माहिती कांदळी औद्योगीक वसाहतीचे उपाध्यक्ष व उद्योजक अतुल कुलकर्णी, संचालक मल्हारी कुटे यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अतुल बेनके यांना पाठिंबा देण्यासाठी आज कांदळी औद्योगीक वसाहतीमधील उद्योजकांची बैठक उपाध्यक्ष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उद्योजक विलास बोऱ्हाडे, दिनेश पटेल, रामदास लेंडे, अशोकराव खांडगे, उत्तम निमसे, सुरेश पटेल, शांताराम बामणे, रवी बामणे, डॉ. उमेश शिंदे, प्रशांत टाकळकर, अमोल डुंबरे, शांताराम गलांडे आदी उपस्थित होते.

उद्योजक निमसे म्हणाले, "स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी माजी आमदार बेनके यांनी 1987 साली कांदळी येथे औद्योगीक वसाहतीची स्थापना केली. त्यांच्या प्रेरणेमुळे तालुक्‍यातील सुमारे पन्नास शेतकऱ्यांच्या मुलांनी वसाहतीत उद्योग सुरू केले आहेत. उद्योगासाठी आवश्‍यक असणाऱ्या वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा देण्यासाठी अतुल बेनके, अमित बेनके यांचे मोठे योगदान आहे. वसाहतीत सुमारे दोन हजार स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये सुमारे चारशे महिला कामगार आहेत.''

कुटे म्हणाले, ""अतुल बेनके व अमित बेनके यांनी दहा एकर क्षेत्रात वसाहतीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार स्थानिक तरुणांना भविष्यात रोजगाराची संधी मिळणार आहे. तालुक्‍याचा शाश्‍वत विकास करण्याची क्षमता आघाडीचे उमेदवार बेनके यांच्यात आहे. त्यामुळे उद्योजकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आजपासून उद्योजक त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख