indurikar pcndt law | Sarkarnama

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नगर : गर्भलिंग निदानाबाबत कीर्तनात केलेल्या वक्तव्यासंबंधी प्रसिद्ध कीर्तन-प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना आरोग्य विभागाकडून अखेर कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांच्या कथित वक्तव्याबद्दल खुलासा मागविण्यात आला असून, त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार असल्याचे जिल्हा शल्यकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर यांच्या एका कीर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ क्‍लीपमध्ये त्यांनी पुत्रप्राप्तीच्या वेळेबाबत काही विधाने केलेली आढ्‌ळतात. जिल्हा रुग्णालयात नुकत्याच झालेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने त्याची रितसर नोंद घेण्यात आली. नियमानुसार यासंबंधी पुढील कारवाई करणे आरोग्य विभागास भाग पडते. त्यामुळे या कायद्यातील तरतुदींनुसारच इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी ही नोटीस पाठविण्यात आली. त्यावर येणारा खुलासा वरिष्ठांकडे पाठवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. 

जिल्हा सल्लागार समिती नगर यांच्या 4 फेब्रुवारीच्या बैठकीत याबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख