इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस पंकजा मुंडे, थोरात, जानकरांनी केला 'एन्जाॅय'

"पैसे घेवून खसकावणारे समाजप्रबोधनकार," असा लौकिक असणारे निवृत्ती महाराज देशमुख यांचा ४८ वा वाढदिवस, सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेस पक्षाच्या दिगज नेत्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. आपल्या आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीने कीर्तनातून प्रबोधन करताना, त्यात अनेक कोट्या, हास्याचे फवारे, मिश्किल चिमटे व जोरदार प्रहार असे अफलातून मिश्रण करणाच्या इंदोरीकर महाराजांचा वाढदिवसही व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थितांनी चांगलाच 'एन्जॉय' केला.
इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस पंकजा मुंडे, थोरात, जानकरांनी केला 'एन्जाॅय'

संगमनेर (नगर)  : "पैसे घेवून खसकावणारे समाजप्रबोधनकार," असा लौकिक असणारे निवृत्ती महाराज देशमुख यांचा ४८ वा वाढदिवस, सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेस पक्षाच्या दिगज नेत्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. आपल्या आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीने कीर्तनातून प्रबोधन करताना, त्यात अनेक कोट्या, हास्याचे फवारे, मिश्किल चिमटे व जोरदार प्रहार असे अफलातून मिश्रण करणाच्या इंदोरीकर महाराजांचा वाढदिवसही व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थितांनी चांगलाच 'एन्जॉय' केला. 

अत्यंत दिलखुलास वातावरणात झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्याच्या महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बिगर राजकीय कार्यक्रमातही राजकिय फोडणीचा तडका देत नेत्यांनी, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाच. जानकरांना उद्देशून बऱ्याच शेतकच्यांनी दुधाचं बोला असा आग्रह केला होता. पण मीच म्हटले, आज ते आपल्याकडे पाहुणे आहेत, 'पाहुणा आला आणि अडचणित सापडला' असं व्हायला नको असे सांगत आमदार थोरातांनी श्रीगणेशा केला. 

इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना बोलायला भांडवल लागेल अशी सुरवात करुन, ‘मी सर्वच पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता' असल्याने, गणेशोत्सवात दुसऱ्या दिवशी बारामतीला तर शेवटी परळीच्या फेस्टीव्हलला असल्याचे सांगितले. याचा धागा पकडून पंकजा मुंडे यांनी परळीच्या फेस्टीव्हलमध्ये महोत्सवाच्या नावाखाली चालणाच्या विविध प्रकारांचे ‘शुध्दीकरण' करण्यासाठी योग्य दिवस निवडल्याचे भाष्य करताना नाव न घेता धनंजय मुडेंवर टीकास्त्र सोडले. 

राजकीय मतभेद असतील, व्यक्तीगत नसल्याने आमदारकीच्या सुरवातीला बाबांशी असलेल्या मैत्रीमुळे सभागृहात पाठराखण करणारे थोरात व राधाकृष्ण यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन, सेल्फी प्रकरणात पक्षाच्या पलीकडे जावून, थोरातांनी बाजू घेतल्याचे सांगितले. संतांचे काम योग्य व्यक्तीचे सारथ्य करणाच्या कृष्णाप्रमाणे असावे, असा चिमटा घेतला. आम्ही बोललो ते करुन दाखवले, त्यामुळे आणखी १० वर्ष काम करण्यासाठी मला आशीर्वादाची गरज आहे, असे म्हणून, 'तुम्ही दहा वर्ष विरोधी पक्षात राहिलात तरी, तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी टिपण्णी आमदार थोरात यांच्याकडे पाहून केली.

जानकर यांनीही, अनुदानापोटी तीन दिवसात ९० कोटी रुपये देणारा पहिला मंत्री असल्याचे सांगून, उर्वरित अनुदान येत्या आठवड्यात देणार असल्याचे स्पष्ट केले. शेकडो कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ व भाविकांच्या या उपस्थितीत ओझर बुद्रुकच्या खंडेराव पाटील खेमनर विद्यालयाच्या प्रांगणातील सोहळ्याला रंग भरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com