indorikar meets fadavnis in sangamner | Sarkarnama

फडणवीसांच्या स्टेजवर आलेले इंदुरीकर खळबळ उडवून गेले!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपला इंदुरीकरांसारखा उमेदवार हवा आहे. 

नगर : भाजपची महाजनादेश यात्रा संगमनेरमध्ये आली असता भाजपच्या व्यासपीठावर आज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर दिसले. 

त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी धनादेश दिला, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या वेळी महाराजांशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय कानमंत्र दिला, याचीच चर्चा सुरू झाली.

इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून युवकांना राजकारणापासून अलिप्त राहण्याचा कायम सल्ला देतात. शेतीची कामे करा, आपला व्यवसाय वाढवा, राजकारण्यांच्या मागे फिरू नका, असा मंत्र देत असताना ते कायम राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र आज त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख